कोरोनाचं संकट रोखता येत नसेल तर लष्कराकडे आरोग्य सेवा सोपवा; नितीशकुमारांना पाटना हायकोर्टाने फटकारले

बिहारमधील वाढत्या कोरोनाच्या संसर्गावरून पाटना उच्च न्यायालयाने बिहारमधील नितीशकुमार सरकारला पुन्हा एकदा फटकारले आहे. (if not improving then hand over health service to army, says patna high court)

कोरोनाचं संकट रोखता येत नसेल तर लष्कराकडे आरोग्य सेवा सोपवा; नितीशकुमारांना पाटना हायकोर्टाने फटकारले
नितीश कुमार
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 6:51 PM

पाटना: बिहारमधील वाढत्या कोरोनाच्या संसर्गावरून पाटना उच्च न्यायालयाने बिहारमधील नितीशकुमार सरकारला पुन्हा एकदा फटकारले आहे. वारंवार आदेश देऊनही कोरोना परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. ही लज्जास्पद बाब आहे. परिस्थिती सुधारत नसेल आणि तुम्हाला कोरोनाचं संकट रोखता येत नसेल तर आरोग्य सेवा लष्कराकडे सोपवा, अशा शब्दात पाटना उच्च न्यायालयाने नितीशकुमार सरकारला फटकारले आहे. (if not improving then hand over health service to army, says patna high court)

बिहारमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपावर पाटना उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने कोर्टाला लॉकडाऊनची माहिती दिली. यावेळी जस्टिस सीएस सिंह यांच्या खंडपीठाने मौखिक सुनावणी करताना सरकारला फटकारले. राज्यात 5 मे पासून ते 15 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे, असंही राज्य सरकारकडून कोर्टाला सांगितलं गेलं. यावेळी कोर्टाने कोरोनाचं संकट निवारण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

गुरुवारी सुनावणी

प्रत्येक वेळी आदेश देऊनही परिस्थितीत सुधारणा होत नाही. ही लज्जास्पद बाब आहे. अशा परिस्थितीत राज्याने आरोग्य सेवा लष्कराच्या हाती सोपवली पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं. याप्रकरणावर आता 6 मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर अॅडव्होकेट जनरल ललित किशोर यांनी मीडियाशी संवाद साधला. कोर्टाने लिखित स्वरुपात अजून काही म्हटलेलं नाही. मात्र, आमच्या मतानुसार तुम्ही फेल ठरत आहात. तर तुम्ही कोविड मॅनेजमेंटची जबाबदारी लष्कराकडे का सोपवत नाही? असं कोर्टाने मला सांगितलं आहे, असं किशोर म्हणाले.

कशाच्या आधारे लष्कराकडे सेवा द्यायची?

निरीक्षणावेळी कोर्टाने हा सवाल केला. त्यावर आम्ही आमची बाजू मांडली आहे. तुम्ही कशाच्या आधारे कोविड मॅनेजमेंटची जबाबदारी लष्कराकडे सोपवण्याचं बोलत आहात? अशी विचारणा आम्ही कोर्टाला केली आहे. जर प्रत्यक्षातील वास्तव योग्य आहे तर केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही ही जबाबदारी लष्कराकडे सोपवू शकता, असंही कोर्टाला सांगितल्याचं किशोर यांनी सांगितलं. त्यानंतर कोर्टाने या विषयावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आधी तुम्ही तुमची सर्व माहिती आम्हाला द्या. त्यानंतर त्यावर विचार करू, असं कोर्टाने म्हटलं आहे. आम्हाला डिटेल्स सादर करण्यासाठी एक दिवसाचा अवधी मिळालेला आहे. आता गुरुवारी त्यावर सुनावणी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. (if not improving then hand over health service to army, says patna high court)

संबंधित बातम्या:

Violence in Bengal : बंगालमध्ये हिंसाचार, पंतप्रधान मोदींचा थेट राज्यपाल जगदीप धनखर यांना फोन; राज्यपाल म्हणाले…

 देशात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, कॅटची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी

तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार, वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; डॉ. गुलेरिया यांचा इशारा

(if not improving then hand over health service to army, says patna high court)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.