Rahul Gandhi flying kiss | ‘राहुल गांधी यांना मुलींची कमतरता नाही’, VIDEO

Rahul Gandhi flying kiss | "भाजपा खासदारावर महिलांना त्रास दिल्याचा, त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिला आणि बाल विकास मंत्र्यांकडून त्या विरोधात एक शब्दही ऐकला नाही. आणि आता तुम्ही फ्लाईंग किस बद्दल बोलताय. तुमचं प्राधान्य कशाला आहे मॅडम"

Rahul Gandhi flying kiss | 'राहुल गांधी यांना मुलींची कमतरता नाही', VIDEO
Rahul gandhi flying kiss row
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 8:32 AM

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किसवरुन मोठा गहजब सुरु आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेनंतर लोकसभेतून निघताना राहुल गांधी यांनी फ्लाईग किस दिला, असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किस वादावरुन गुरुवारी भाजपाने जोरदार आंदोलन केलं. भाजपाच्या एकूण 20 महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या या वर्तनाविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे रीतसर तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिली की, नाही? हे अजून सिद्ध झालेलं नाही.

राहुल गांधी यांच्या कृतीमागे वात्सल्याची भावना होती. फक्त महिला खासदारांना पाहून त्यांनी असं केलं नव्हतं, असं ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

वृद्ध महिलेला फ्लाईंग किस का देतील?

या विषयावरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या वादामध्ये आता एका महिला आमदाराने केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “आमच्या राहुल गांधींना मुलींची कमतरता नाही. जर त्यांना फ्लाईंग किस द्यायचीच असेल, तर ते तरुण मुलीला देतील. ते वृद्ध महिलेला फ्लाईंग किस का देतील? हे सर्व आरोप निराधार आहेत” असं नीतू सिंह म्हणाल्या. त्या बिहारच्या काँग्रेस आमदार आहेत.

शेहझाद पूनावाला यांनी टि्वटमध्ये काय म्हटलय?

भाजपा नेत्यांनी नीतू सिंह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. “महिला विरोधी काँग्रेस सभागृहातील राहुल गांधींच्या दुराचाराचा बचाव करु शकते” असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहझाद पूनावाला यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. ‘तुमचं प्राधान्य कशाला आहे मॅडम’

तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला. बृज भूषणच्या विषयावर तुम्ही गप्प का ? असा सवाल केला. “भाजपा खासदारावर आपल्या चॅम्पियन कुस्तीपटूंना त्रास दिल्याचा, त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिला आणि बाल विकास मंत्र्यांकडून त्या विरोधात एक शब्दही ऐकला नाही. आणि आता तुम्ही फ्लाईंग किस बद्दल बोलताय. तुमचं प्राधान्य कशाला आहे मॅडम” असा सवाल महुआ मोईत्रा यांनी विचारला.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.