Imran Khan Government : इमरान खान यांची सुप्रिम कोर्टानं काढली विकेट! अविश्वास प्रस्तावाची अग्निपरीक्षा द्यावीच लागणार

पाकिस्तान ससंदेच्या उपाध्यक्षांचा निर्णय हा बेकायदेशीर आहे असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. इम्रान खान सरकारला हा मोठा झटका आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आजच्या निकालाकडे लागले होते. इम्रान खान सरकारच्या अडचणी आणखी या निर्णयाने वाढल्या आहेत.

Imran Khan Government : इमरान खान यांची सुप्रिम कोर्टानं काढली विकेट! अविश्वास प्रस्तावाची अग्निपरीक्षा द्यावीच लागणार
पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा इम्रान खान यांना दणकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 9:25 PM

पाकिस्तान : पाकिस्तान ससंदेच्या उपाध्यक्षांचा (Pakistan Parliament) निर्णय हा बेकायदेशीर आहे असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने (Pakistan Supreme Court) दिला आहे. इम्रान खान सरकारला (Imran Khan) हा मोठा झटका आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आजच्या निकालाकडे लागले होते. इम्रान खान सरकारच्या अडचणी आणखी या निर्णयाने वाढल्या आहेत. अविश्वास प्रस्तावावर 9 एप्रिलला मतदान घेतलं जाणार आहे. नव्यानं निवडणुका घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. इमरान खान यांना अविश्वास प्रस्तावाच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. 90 दिवसांत निवडणुका घेण्याचा निर्णयही रद्दबातल ठरवण्यात आला आहे. या निर्णयानं आता इमरान खान यांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण जगाचं लक्ष पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेलं होतं. या निर्णयाआधी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यानंतर इम्रान खान यांना दणाका देणारा हा मोठा निर्णय समोर आला आहे.

निकाल येण्याआधी काय काय झालं?

  1. निकालाआधी सुप्रीम कोर्टातील न्यायाधिशांची एकमेकांसोबत चर्चा
  2. कोर्टरुम बाहेर पोलिस आणि वकिलांमध्ये झटापट
  3. सुप्रीम कोर्टाबाहेर मोठ्या संख्येनं सुरक्षा दलाचे जवान तैनात

आता पाकिस्तानात काय होऊ शकतं?

  1. काळजीवाहू पंतप्रधान ठेवावा लागणार
  2. इमरान खान आणि शाहजाब शरीफ यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नाव दिलं जाण्याची शक्यता
  3. पाकिस्तानच्या संसदेत सर्वपक्षीय सदस्य नावांवर विचार करणार
  4. समिती एक निश्चित केलेलं नाव निवडणूक आयोगाला देईल
  5. यानंतर निवडणूक आयोग काळजीवाहू पंतप्रधानांचं नाव जाहीर करेल

महत्त्वपूर्ण तारखा!

  1. 8 मार्च : सर्व विरोधी पक्षांकडून इमरान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर
  2. 28 मार्च : पाकिस्तानच्या संसदेत पहिल्यांदा अविश्वास प्रस्ताव आणला
  3. 31 मार्च : विशेष सत्राद्वारे चर्चा आणि मतदान घेण्याचं ठरलं
  4. 3 एप्रिल : अविश्वास प्रस्तावावर मतदान पार पडलं, मात्र संसदेच्या उपाध्यक्षांनी अविश्वास प्रस्ताव रद्दबातल ठरवला
  5. 3 एप्रिल : अविश्वास प्रस्ताव रद्द होताच इमरान यांचा राष्ट्रपती आरीफ अल्वी यांना संसद बरखास्त करण्याचा सल्ला, तसंच नव्यानं निवडणूक घेण्याची मागणी
  6. 7 एप्रिल : पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक सुनावणी, इम्रान खान यांना मोठा दणका
  7. 9 एप्रिल :  पाकिस्तान संसदेत इम्रान खान सरकारची अग्निपरीक्षा

पाकिस्तानच्या संसदेतील मॅजिक फिगर काय?

एकूण सदस्य संख्या 342 बहुमत – 172 इमरान खान यांच्याकडे किती संख्याबळ – 142 विरोधकांचं सख्याबळ किती – 199

Special : सावकार मालामाल आणि थकबाकीदार बेहाल! चीनकडून लोन घेतल्यामुळे श्रीलंकेचं वाटोळं झालं?

Photo Gallery | रशिया- युक्रेन युद्ध ; बेचिराख झालेले बुचा शहर

भारतात Hijab Controversy; अल कायदाचा क्रूर दहशतवादी बिळातून बाहेर, म्हणाला…

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.