Horrible: 90 सेकंदात 17 कानफटात, एवढ्याशा कारणावरुन महिलेने रिक्षावाल्याचा भर रस्त्यात कुदवले, पाहणारेही हैराण
या रिक्षाचालकाचे नाव मिथुन चौधरी असे असून तो नोएडाच्या सेक्टर 82 मधील रहिवासी आहे. ई रिक्षा चालवून तो त्याच्या कुटुंबाची गुजराण करतो. अचानक झालेल्या मारहाणीने हा रिक्षाचालकही गांगरुन गेला. त्यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या मारहाण करणाऱ्या महिलेला तिच्या घरातून अटक केली.
नवी दिल्ली, नोएडा – नोएडातील (Noida)एका कानफटात मारणाऱ्या महिलेचा व्हिडीओ (woman video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या महिलेने भर रस्त्यात रिक्षावाल्याच्या कानफटात लगावल्याचा हा व्हिडीओ आहे. नोएडाच्या सेक्टर 110 मध्ये बाजारात हा प्रकार घडला. बाजूने जात असलेल्या ई रिक्षाचा थोडासा धक्का या महिलेला लागल्यानंतर, या महिलेने रिक्षाचालकाला वाईट मारहाण (slaps) केली. पहिल्यांदा तिने समोर जात ही ई रिक्षा थांबवली आणि त्या रिक्षाचलाकच्या कानफटात मारण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे 90 सेंकदात म्हणजे अवध्या दीड मिनिटांत तिने या रिक्षावाल्याच्या 17 कानफटात लगावल्या. भररस्त्यात हा प्रकार घडला, त्यावेळी तिथे आजूबाजूला अनेक जण उपस्थित होते. त्यांच्यापैकी अनेकांना या रिक्षावाल्याची दया आली. अनेक जणांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
मारहाण करणारी महिला अटकेत
या रिक्षाचालकाचे नाव मिथुन चौधरी असे असून तो नोएडाच्या सेक्टर 82 मधील रहिवासी आहे. ई रिक्षा चालवून तो त्याच्या कुटुंबाची गुजराण करतो. अचानक झालेल्या मारहाणीने हा रिक्षाचालकही गांगरुन गेला. त्यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या मारहाण करणाऱ्या महिलेला तिच्या घरातून अटक केली आणि नंतर कोर्टात हजर केले. या मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात मारपीट करणे आणि अतर काही कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
थाना फेस-2 पुलिस द्वारा ई-रिक्शा चालक के साथ मारपीट करने वाली महिला अभियुक्ता गिरफ्तार। pic.twitter.com/wyNTeEZl9G
— POLICE COMMISSIONERATE GAUTAM BUDDH NAGAR (@noidapolice) August 13, 2022
महिलेने मारहाण केल्यानंतर पैसेही हिसकावून घेतले
या रिक्षाचालकाला मारहाण करुनच ही महिला शांत बसली नाही. एकामागून एक कानफटात मारत असताना ती या रिक्षाचालकाला शिवीगाळही करीत होती. त्यानंतर तिने त्याच्या शर्टाचा खिसा फाडला आणि जबरदस्तीने मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतले. त्यानंतर ती या रिक्षाचालकाकडे त्याच्या रिक्षाची किल्लीही मागू लागली. पीडित रिक्षाचालकाने जेव्हा रिक्षाची किल्ली देण्यास नकार दिला, तेव्हा तिने त्याला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर ई रिक्षा आपल्यासोबत घेऊन चल, असा हट्ट धरुन ती रस्त्यात त्याच्याशी भांडू लागली.
गरीब रिक्षाचालकांची नाचक्की
दिल्ली आणि नोएडा परिसरात ई रिक्षा चालवून गुजराण करणारे अनेक रिक्षाचलक आहेत. ते त्यात सेक्टरमध्ये अगदी कमी पैशांत प्रवाशांना सुविधा देत असतात. गरीब स्थितीत असलेल्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नसतो. अशा प्रकाराने भर रस्त्यात झालेल्या मारहाणीच्या या घटनेने नाहक अशा रिक्षाचालकांची नाचक्की होत असल्याची तक्रार रिक्षाचालक व्यक्त करत आहेत.