Jharkhand Political Crisis : झारखंडमध्ये भाजपचे 16 आमदार सोरेन सरकारच्या संपर्कात, केंद्रात खळबळ

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती ज्या पद्धतीने ईडीच्या धाडी पडल्या त्याप्रमाणे झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या व्यक्तींवरती देखील ईडीच्या धाडी पडल्या आहेत.

Jharkhand Political Crisis : झारखंडमध्ये भाजपचे 16 आमदार सोरेन सरकारच्या संपर्कात, केंद्रात खळबळ
झारखंडमध्ये भाजपचे 16 आमदार सोरेन सरकारच्या संपर्कात, केंद्रात खळबळ Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 8:06 AM

रांची – भाजपाने (BJP) ज्या राज्यात आपली सत्ता नाही तिथं इतर पक्षातील आमदारांना फोडून आपलं सरकार स्थापण केलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मागच्या महिन्यात शिवसेना (Shivsena) पक्षातील आमदार फोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापण केली. तोच प्रकार इतर राज्यात करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे अनेक राष्ट्रीय नेते बोलून दाखवत आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक राज्यात भाजपाची सत्ता असेल. झारखंडच्या (Jharkhand) सोरेन सरकारने आमच्यासोबत भाजपाचे 16 आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केल्याने केंद्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रानंतर झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगालमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु असून तिथंही कशी सत्ता येईल याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून केला जात आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपाचे सोळा आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

ईडीच्या धाडीमुळे झारखंडमधील सरकार अस्थिर

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती ज्या पद्धतीने ईडीच्या धाडी पडल्या त्याप्रमाणे झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या व्यक्तींवरती देखील ईडीच्या धाडी पडल्या आहेत. पंकज मित्रा हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. यांना ईडीने अटक केली असून त्यांच्याकडील 36 कोटी रुपये जप्त केले आहेत. मुळात झारखंडमधील कॉंग्रेसचे सरकार धोक्यात आले आहे. त्यावर काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी भाजपचे आमच्या सोळा आमदार संपर्कात असल्याचे विधान केले आहे. विशेष म्हणजे भाजपातील आमदार नाराज असून 26 आमदारांपैकी सोळा आमदार आम्हाला पाठींबा द्यायच्या तयारीत आहेत. ते त्यांचा वेगळा गट तयार करून कॉंग्रेसला पाठिंबा देतील. तसेच त्यांच्या प्रस्तावावर आम्ही गांभीर्याने विचार करीत असल्याचे देखील भट्टाचार्य यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाने दावा फेटाळून लावला

भाजपच्या प्रवक्तांनी सोरेन यांचा दावा फेटाळून लावला आहे. तिथले अनेक आमदार भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले आहेत. हेमंत सोरेन यांचा पक्ष त्यांचं अस्तित्व ठिकवण्यासाठी ती लढत आहे.तसेच खोट्या गोष्टी सांगून पक्ष वाचवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात तिथंही राजकीय मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.