AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेळता खेळता 40 फूट खोल विहिरीत पडला, पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, ‘ती’ देवदूत बनून आली अन्…

मुलगा विहिरीच्या आसपास खेळत होता. खेळता विहिरीच्या जवळ गेला अन् तोल जाऊन आत पडला. पण 40 फूट खोल विहिरीत पडल्यानंतर पुढे जे घडले त्यावर विश्वास बसणे कठिण.

खेळता खेळता 40 फूट खोल विहिरीत पडला, पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, 'ती' देवदूत बनून आली अन्...
विहिरीत पडलेल्या तीन वर्षाच्या मुलाला वाचवलेImage Credit source: Google
| Updated on: May 10, 2023 | 6:50 PM
Share

चतरा : झारखंडमधील चतरा जिल्ह्यात एक अनोखी घटना उघडकीस आली आहे. ही घटना उघड होताच जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. खेळता खेळता एक तीन वर्षाचा बालक विहिरीजवळ पोहचला. विहिर 40 फूट खोल होती. तीन वर्षाच्या मुलाचा तोल जाऊन तो 40 फूट विहिरीत पडला. पण त्याचवेळी तिथे असलेल्या 13 वर्षांच्या मुलीने मुलाला विहिरीत पडताना पाहिले आणि तात्काळ विहिरीत उडी मारली. मात्र मुलीचे धाडस वाया गेले नाही. खरोखरच तीन वर्षाच्या बालकासाठी ही 13 वर्षाची चिमुरडी देवदूत बनली अन् जिल्ह्यात एकच चर्चा झाली. मुलीने धाडस दाखवत मुलाचे प्राण वाचवले.

काय घडले नक्की?

रांचीपासून सुमारे 170 किमी अंतरावर असलेल्या चतरा जिल्ह्यातील मयूरहंद ब्लॉकमधील हुसैन गावात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. एक तीन वर्षाचा बालक खेळता खेळता विहिरीजवळ गेला. यावेळी तोल जाऊन तो विहिरीत पडला. ही बाब 13 वर्षाच्या मुलीने पाहिली आणि मुलाला वाचवण्यासाठी तात्काळ विहिरीत उडी घेतली.

मुलीने मुलाला एका हाताने विहिरीत पकडले आणि दुसऱ्या हाताने मोटार धरून मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागली. मुलीचा आवाज ऐकून काही गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर मुलगी आणि चिमुकल्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. चतरा उपायुक्त अबू इम्रान यांनी सांगितले की, घटनेचा तपशील मागवला आहे. 13 वर्षीय मुलीचे शौर्य पाहून तिला बक्षीस देण्यात येणार आहे.

या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीला ग्रामपंचायत नेते, सरपंच आणि अन्य गावकऱ्यांनी शेख भिखारी मेडिकल कॉलेज हजारीबाग येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.