AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MP Murder : रक्षक बनला भक्षक! मध्य प्रदेशात पोलिसाने केली मुलाची हत्या; घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ

आरोपी शर्मा हा 4 मे रोजी दतिया प्राईड डे ड्युटीसाठी दतिया येथे आला होता. त्याची ड्युटी पंचशील नगरजवळ होती. त्याचवेळी हत्या झालेला मुलगा त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता. आरोपी शर्माने त्याला दम दिल्यानंतरही तो पळत नव्हता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असलेल्या आरोपी शर्माने अखेर मुलाचा गळा आवळून खून केला.

MP Murder : रक्षक बनला भक्षक! मध्य प्रदेशात पोलिसाने केली मुलाची हत्या; घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ
मध्य प्रदेशात पोलिसाने केली मुलाची हत्याImage Credit source: टीव्ही 9
| Updated on: May 11, 2022 | 8:38 PM
Share

भोपाळ : वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या सहा वर्षांच्या गरीब मुला (Boy)ची एका पोलिस हेडकॉन्स्टेबल (Police Head Constable)ने गळा दाबून हत्या (Murder) केली. मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. आरोपीने मृतदेह आपल्या कारमध्ये टाकून शेजारच्या ग्वाल्हेर जिल्ह्यातील एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. बुधवारी या धक्कादायक घटनेची माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेचा अधिक तपशील पत्रकारांना सांगितला. या घटनेने रक्षक भक्षक बनल्याचे कटू सत्य अधोरेखित केले आहे.

वारंवार पैशाची मागणी केली म्हणून मुलाचा गळा दाबला!

घटनेबाबत दतिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अमन सिंह राठोड यांनी पत्रकारांना सांगितले की, हत्येची घटना 5 मे रोजी घडली. ग्वाल्हेरच्या पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये तैनात हेड कॉन्स्टेबल रवी शर्माला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी शर्मा हा 4 मे रोजी दतिया प्राईड डे ड्युटीसाठी दतिया येथे आला होता. त्याची ड्युटी पंचशील नगरजवळ होती. त्याचवेळी हत्या झालेला मुलगा त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता. आरोपी शर्माने त्याला दम दिल्यानंतरही तो पळत नव्हता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असलेल्या आरोपी शर्माने अखेर मुलाचा गळा आवळून खून केला.

आरोपी पोलिसांकडून अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्याची कबुली

जबाबात आरोपी शर्माने पोलिसांना सांगितले कि गेल्या अनेक महिन्यांपासून तो नैराश्य आणि मानसिक तणावाखाली आहे. त्यात गरीब मुलगा वारंवार पैसे मागून मला त्रास देत होता. त्याच रागातून मी मुलाला गाडीत नेले आणि त्याचा गळा आवळून खून केला. नंतर त्याचा मृतदेह गाडीतून ग्वाल्हेरला नेला आणि विवेकानंद तिराहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झाशी रोडजवळ फेकून दिला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आणि तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी शर्माला अटक करून कारसह अन्य महत्त्वाचे पुरावे त्याच्याकडून हस्तगत केले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसाच्या कारनाम्याचा पर्दाफाश

घटनेबाबत दतियाच्या पंचशील कॉलनीतील रहिवासी संजीव सेन यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा मयंक सेन (6) याला 5 मे रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. त्याआधारे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुलाच्या शोधासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली. याचदरम्यान ग्वाल्हेरच्या झाशी रोड परिसरात 6-7 वर्षे वयोगटातील एका अनोळखी मुलाचा मृतदेह आढळून आला. नंतर या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असता तो बेपत्ता मयंकचाच मृतदेह असल्याचे उघड झाले. हा मुलगा ज्या भागातून बेपत्ता झाला होता, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला काही संशयास्पद हालचाली करताना पाहिले. नंतर तो आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबल शर्मा हाच असल्याचे सिद्ध झाले.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.