AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS Weapon Worship | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्र पूजन वादात, प्रकरण जिल्हा न्यायालयात, काय दिले पोलिसांना आदेश?

RSS Weapon Worship | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजन करतो. हे शस्त्र पूजन आता वादात सापडले आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात

RSS Weapon Worship | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्र पूजन वादात, प्रकरण जिल्हा न्यायालयात, काय दिले पोलिसांना आदेश?
संघाचं शस्त्र पूजन वादातImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 21, 2022 | 3:54 PM
Share

RSS Weapon Worship | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विजयादशमीच्या (Vijaya Dashami) दिवशी शस्त्र पूजन करतो. हे शस्त्र पूजन आता वादात सापडले आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते मोहनीश जबालपूरे (Mohanish Jabalpure) यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात सालाबादाप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजन (Weapon Worship)करण्यात येते. त्याविरोधात जबालपूरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात (District Session Court) यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. 2018 मध्ये त्यांनी या शस्त्रांप्रकरणी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. पोलीस योग्य ती कार्यवाही करण्यात येत नसल्याने नाराज जबालपूरे यांनी प्रकरणात न्यायालयाकडे दाद मागितली आहे. आता या याचिकेत न्यायालयाने आदेश दिल्याने संघासह पोलिसांच्याही अडचणी ही वाढल्या आहेत.

काय आहे प्रकरण

काँग्रेसचे कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असलेल्या आणि विजयादशमीच्या दिवशी संघाच्या नागपुरातील मुख्यालयात शस्त्र पूजन केल्या जाणाऱ्या शस्त्रा संदर्भातली माहिती मागितली होती. त्यासाठी त्यांनी माहितीचा अधिकारही वापरला होता. 2018 मध्ये स्थानिक कोतवाली पोलीस स्थानकाकडे त्यांनी याविषयीची माहिती मागितली होती. तसेच निवडणूक आणि इतर सणांच्या काळात नियमाप्रमाणे हे शस्त्र पोलिसांकडून जप्त केले जातात का? अशी विचारणा केली होती. पोलिसांनी याप्रकरणात कुठलेही उत्तर त्यांना दिले नाही. त्यानाराजीने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.

काय आहेत आदेश

संघाच्या मुख्यालयात विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजन केल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या माहिती संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने नागपूर शहर पोलिसांच्या कोतवाली पोलीस स्टेशनला नोटीस बजावली. तसेच मोहनीश जबलापुरे यांच्या प्रकरणात चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

विजयादशमीला शस्त्र पूजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना 1925 मध्ये विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी झाली. दशमीला शस्त्रपूजन करण्याची प्रथा आहे. यादरम्यान संघाचे सदस्य यज्ञ करून शस्त्रांची पूजा करतात. संघाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात दरवर्षी शास्त्रपूजन हे विशेष असते.

का केली जाते ‘शस्त्रपूजा’?

दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रास्त्रांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक घरात आणि काही संघटनांकडून शस्त्रांची पूजा केली जाते. नऊ दिवसांच्या पूजेनंतर दहाव्या दिवशी विजयाच्या इच्छेने शस्त्रांची पूजा करतात. विजयादशमीला शक्तीरूपा दुर्गा, कालीच्या पूजेसह शस्त्रपूजनाची परंपरा हिंदू धर्मात फार पूर्वीपासून आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.