Income Tax Raid : चेन्नईच्या सर्वांत मोठ्या ज्वेलर्स परिसरात छापेमारी, 1000 कोटींच्या अघोषित संपत्तीचा खुलासा?

इनकम टॅक्स विभागाने (प्राप्तिकर विभाग) दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या 'सराफा परिसरात' छापा टाकला ज्यातून 1 हजार कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न समोर आले आहे.

Income Tax Raid : चेन्नईच्या सर्वांत मोठ्या ज्वेलर्स परिसरात छापेमारी, 1000 कोटींच्या अघोषित संपत्तीचा खुलासा?
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 6:46 PM

चेन्नई : इनकम टॅक्स विभागाने (प्राप्तिकर विभाग) दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या ‘सराफा परिसरात’ छापा टाकला ज्यातून 1 हजार कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न समोर आले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने रविवारी (आज) ही माहिती दिली. मात्र कोणत्या व्यापार्‍यांच्या दुकानांवर हा छापा टाकला आहे, याची माहिती कर मंडळाने दिलेली नाही. (Income Tax Raids Chennai jewellery area)

कुठे कुठे छापेमारी…?

आयकर विभागाचे हे छापे चेन्नई, मुंबई, कोयंबतूर, तिरुचिरापल्ली, त्रिसूर, नेल्लोर, जयपूर आणि इंदोरच्या 27 परिसरात 4 मार्च रोजी पडले. याच प्रकरणांचा तपास सध्या सुरु आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा दावा काय?

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दावा केला आहे की छापे दरम्यान अघोषित 1.2 कोटी रूपयांची रोकडही जप्त केली गेली आहे. सीबीडीटीने एक निवेदन जारी करुन दावा केला आहे की, सराफा व्यावसायिकांच्या आवारातून मिळालेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की रोख विक्री, बनावट रोख पत, खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नावाखाली ‘डमी’ खात्यात रोकड जमा केली गेली.

नोटाबंदीच्या काळात रोख रक्कम जमा केल्याची माहिती

सीबीडीटीच्या निवेदनात म्हटले आहे की, “नोटाबंदीच्या काळात रोख रक्कमही जमा करण्याबाबतही माहिती आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) कर विभागाचा प्रशासकीय अधिकार आहे. दागदागिने विक्रेत्याच्या बाबतीत असे दिसून आले की “करदात्याने स्थानिक फायनान्सरांकडून रोख कर्ज घेतले आणि परतफेड केली, बिल्डरांना रोख कर्ज दिले आणि रिअल इस्टेटमध्ये रोख रक्कम गुंतवली.”

ज्वेलर्सडून बिना हिशेब सोन्याची जोरदार खरेदी

संबंधित व्यावसायिकांनी हिशेब न ठेवता सोने खरेदी केल्याचा दावाही बोर्डाने केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, “छापेमारीमध्ये आतापर्यंत एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे अघोषित उत्पन्न सापडले आहे.”

(Income Tax Raids Chennai jewellery area)

हे ही वाचा :

Income Tax Raid | इन्कमटॅक्सची धाड दुसऱ्या दिवशीही सुरूच! तापसी-अनुरागवर आता ‘ED’ची टांगती तलवार

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.