India Vs Canada Issue | ‘या’ चार देशांच्या नादाला लागून कॅनडाने घेतला भारताशी पंगा

India Vs Canada Issue | 'या' चार देशांनी भारताबद्दल कॅनडाला असं काय सांगितलं?. हे FIVE EYES कोण आहेत? भारत-कॅनडा वादाशी त्यांचं काय कनेक्शन आहे? कुठल्या आधारावर कॅनडाने इतका मोठा आरोप केला?.

India Vs Canada Issue | 'या' चार देशांच्या नादाला लागून कॅनडाने घेतला भारताशी पंगा
justin trudeau
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 8:26 AM

नवी दिल्ली : सध्या कॅनडा आणि भारतामधील तणाव टिपेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून दररोज परस्पराविरोधात वेगवेगळ्या Action घेतल्या जात आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन या सर्व वादाला सुरुवात झाली. G20 परिषदेसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी हरदीप सिंह निज्जरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरलं. भारत सरकारचे एजंट या हत्येमागे असल्याचा आरोप त्यांनी केला. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जर भारताच्या रडारवर होता. भारताच्या मोस्ट वाँटेडच्या यादीत तो होता. कॅनडाच्या सरेमध्ये अज्ज्ञातांनी गोळी झाडून त्याची हत्या केली. कॅनडा या हत्येसाठी भारताला जबाबदार ठरवत आहे. भारताने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावताना आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या दोन्ही देशातील तणाव खूपच वाढला आहे.

आगमी काळात याचे व्यापारी आणि अन्य मैत्रीपूर्ण संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. जस्टिन ट्रूडो यांनी भारतासोबत काम करत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताच महत्त्व वाढतय. आपल्याला त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे अशी ट्रूडो यांची भूमिका आहे. “मला चिथावणी देऊन समस्या निर्माण करायची नाहीय. पण कॅनडामध्ये कायद्याच राज्य आहे. कॅनेडियन नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे” असं जस्टिन ट्रूडो म्हणाले. या वादामुळे भारताने एक मोठं पाऊल उचललं आहे. भारताने व्हिसा बंदी केली आहे. त्यामुळे कॅनेडीयन नागरिक भारतात येऊ शकणार नाहीत. कॅनडाने भारतीय डिप्लोमॅट्सवर कारवाई केली. त्यानंतर भारताने सुद्धा कॅनडाच्या डिप्लोमॅटला देश सोडण्याचा आदेश दिला.

कोणी भरले कॅनडाचे कान?

हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन कॅनडाने जे आरोप केले, त्यामागे FIVE EYES आहेत. भारतीय डिप्लोमॅट्सवर पाळत ठेवण्यात आली. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने यामध्ये कॅनडाला मदत केली. त्या आधारावर कॅनडाने हे आरोप केले आहेत. एका अधिकाऱ्याने अनौपचारिक चर्चेमध्ये ही माहिती दिली. या चार देशांनी मिळून एक इंटेलिजेंस इनपुट दिला. कॅनडासह या चार देशांचा समूह FIVE EYES म्हणून ओळखला जातो. या FIVE EYES च इंटेलिजेंस इनपुट या सर्व वादाच्या मूळाशी आहे.

'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.