India Canada Tension : पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचा पुन्हा फुसका दावा! आता म्हणतायेत..

India Canada Tension : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचे खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्यावरील प्रेम पुन्हा उफाळून आले आहे. निज्जरच्या हत्येने ट्रूडो यांना धक्का बसला आहे. यापूर्वी त्यांनी ही हत्या भारत सरकारच्या इशाऱ्यावरुन झाल्याचा सूर आळवला होता. आता पुन्हा त्यांनी नवीन दावा केला आहे...

India Canada Tension : पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचा पुन्हा फुसका दावा! आता म्हणतायेत..
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 10:30 AM

नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (PM Justin Trudeau) यांचा भारतविरुद्ध डावपेच सुरुच आहे. दर आठवड्याला याप्रकरणी नवीन अध्याय आणायचा आणि रवंथ करायचे असा त्यांचा परिपाठ सुरु आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येचा त्यांना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी त्यांनी ही हत्या भारत सरकारच्या इशाऱ्यावरुन झाल्याचा सूर आळवला होता. याविषयीचे पुरावे अद्यापही त्यांनी दिलेले नाही. यापूर्वीच विरोधकांनी त्यांना पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. आता निज्जरच्या हत्येप्रकरणी (Khalistan Terrorist) त्यांनी रडीचा डाव टाकला आहे. काय आहे त्यांचा हा नवीन दावा? हा दावा करण्यासाठी त्यांनी इतका उशीर का केला, याविषयीची चर्चा आंतरराष्ट्रीय मंचावर रंगली आहे.

काय आहे नवीन दावा

पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी शुक्रवारी ओटावा येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येप्रकरणी काही आठवड्यापूर्वीच भारतीय एजंटचा सहभाग असल्याचे पुरवा नवी दिल्लीशी शेअर केल्याचा दावा त्यांनी केला. निज्जरच्या हत्येप्रकरणी ट्रूडो सर्वच बाजूने घेरल्या गेल्याने त्यांनी हा नवीन दावा केला आहे.

हे सुद्धा वाचा

निज्जरची हत्या हे गंभीर प्रकरण

भारताने 2018 सालीच खलिस्तान चळवळीतील दहशतवाद्यांची यादी कॅनडाच्या पंतप्रधानांना सोपवली होती. त्यात हरदीप सिंग निज्जरचे पण नाव होते. या यादीतील अनेक दहशतवाद्यांना कॅनडाने उघड आश्रय दिला आहे. त्याविषयी ट्रूडो चकार शब्द काढायला तयार नाहीत. पण निज्जरची हत्या हे त्यांच्या राष्ट्रासाठी गंभीर प्रकरण असल्याचा दावा ते करत आहेत. निज्जर हा कॅनेडाचा नागरिक आहे. त्याची हत्या भारतीय सरकारच्या इशाऱ्यावरुन झाल्याचा राग ते आलापत आहेत.

यांना दिला आश्रय

2018 मध्ये ट्रूडो हे भारत दौऱ्यावर होते. अमृतसर येथे पंजाब सरकारने त्यांना फुटीरतावाद्यांची यादी सोपवली होती. त्यात हरदीप सिंग निज्जर याच्यासह गुरजीत सिंग चिम्मा, गुरप्रीत सिंग, गुरजिंदर सिंग पन्नू, मलकीत सिंग उर्फ फौजी, परविकर सिंग दुलाई, भगत सिंग ब्रार, तेहल सिंग, सुलिंदर सिंग, हरदीप सोहोटा या दहशतवाद्यांचे नाव यादीत होते.

भारताने केली कानउघडणी

भारताने ट्रूडो यांच्या दाव्यावर तातडीने प्रतिक्रिया नोंदवली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी स्पष्टीकरण दिले. कॅनडाने अशी कोणतीही माहिती यापूर्वी आणि या हत्येनंतर शेअर केली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ट्रूडो यांचा दावा फुसका असल्याचे समोर आले आहे. उलट पक्षी कॅनडा भारतीय फुटरतावाद्यांना आश्रय देत असल्याबद्दल भारताने कॅनडाची पुन्हा कानउघडणी केली.

धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.