India vs Canda Issue | खलिस्तान्यांची आता खैर नाही, मोदी सरकारची मोठ्या स्ट्राइकची तयारी
India vs Canda Issue | भारतीय दूतावास आणि अन्य संस्थांमध्ये घुसून भारतीय मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांची आता खैर नाहीय. सरकारने अशा लोकांवर डबल स्ट्राइकची योजना बनवलीय.
नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामधील संबंध सध्या प्रचंड ताणले गेले आहेत. कॅनडातून खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांना आर्थिक रसद दिली जाते. त्यांना पाठिशी घातलं जातं. त्यामुळे हा तणाव निर्माण झालाय. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर हा तणाव आणखी वाढला. आता भारत सरकारने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. सरकार खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. परदेशात भारतीय मालमत्तेची नासधूस आणि हिंसक प्रदर्शन करणाऱ्या खलिस्तान्यांना सोडण्याच्या मूडमध्ये नाहीय. अशा लोकांचे पासपोर्ट आणि ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडियाचे कार्ड रद्द करण्याची तयारी आहे.
या संदर्भात भारतीय यंत्रणांनी चौकशी सुरु केलीय. परदेशातील भारतीय संस्था, दूतावासाच्या कार्यालयात तोडफोड तसेच हिंसक विरोध प्रदर्शन करणाऱ्यांची भारतीय पासपोर्ट आणि ओसीआय कार्ड रद्द होऊ शकतात. याची सर्व माहिती भारताच्या सर्व विमानतळांवर दिली जाईल. भारतात अशा लोकांविरोधात कायदेशीर कारवाई कशी करायची त्याची योजना तयार झालीय. मागच्या काही महिन्यात भारतीय दूतावासाबाहेर जी काही हिंसक विरोध प्रदर्शन झाली, त्याची सर्व माहिती कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि अन्य देशांना देण्यात आलीय. जे सतत विरोध प्रदर्शनात सहभागी होतात, अशा लोकांची यादी तयार केली जातेय. भारताची प्रतिमा मलिन करणं हा त्यामागे त्यांचा उद्देश आहे. NIA कडून किती दहशतवाद्यांची यादी तयार?
भारताविरोधात कट, कारस्थान रचणाऱ्या खलिस्तान्यांवर भारतीय तपास यंत्रणांनी डबल स्ट्राइक केलाय. भारतात अशा दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु झालीय. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने अशा 25 दहशतवाद्यांची यादी तयार केलीय. एनआयएने शनिवारी चंदीगडमध्ये खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूची संपत्ती जप्त केली. पन्नू भारताच्या वाँटेड दहशतवाद्यांच्या लिस्टमध्ये आहे. भारतात त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.