India Corona Cases | भारतातील नागरिकांना दिलासा, कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात काहीशी घट
भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. (India Corona Cases Update)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा सातत्याने वाढत आहे. मात्र गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांचे आकड्यात घट झाली आहे. भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तर काल दिवसभरात तब्बल 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे देशातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (India Corona Cases Update 368147 new COVID 19 case)
भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 पर्यंत पोहोचली आहेत. तर दुसरीकडे 3417 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा हा 2 लाख 18 हजार 959 इतका झाला आहे.
तसेच भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात 3,00,732 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यात 34 लाख 13 हजार 642 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. दरम्यान भारतात आतापर्यंत 15 कोटी 71 लाख 98 हजार 207 जणांना कोरोनाची लस घेतली आहे.
भारत में पिछले 24 घंटे में #COVID19 के 3,68,147 नए मामले आने के बाद कुल पॉजिटिव मामलों की संख्या 1,99,25,604 हुई। 3,417 नई मौतों के बाद कुल मौतों की संख्या 2,18,959 हो गई है।
देश में सक्रिय मामलों की कुल संख्या 34,13,642 है और डिस्चार्ज हुए मामलों की कुल संख्या 1,62,93,003 है। pic.twitter.com/0EIFqt5lmO
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2021
देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्त : 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 कोरोना उपचारानंतर बरे झालेले एकूण रुग्ण : 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 देशातील एकूण कोरोनाबळी : 2 लाख 18 हजार 959 देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्ण : 34 लाख 13 हजार 642
देश में कुल वैक्सीनेशन का आंकड़ा 15,71,98,207 हो गया है। #CovidVaccine https://t.co/o9hyiJG4ZK
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2021
महाराष्ट्रातील कोरोना अपडेट
राज्यात काल दिवसभरात तब्बल 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Maharashtra Corona Update) आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दररोज वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दररोज कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाख 22 हजार 401 वर पोहोचला आहे. यापैकी 39 लाख 81 जार 685 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात काल दिवसभरात 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं जरी असलं तरी बाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 669 रुग्णांचा मृ्त्यू झालाय. रुग्णांचा मृत्यू आकडा कमी करणं हे सरकार आणि प्रशासनापुढील मोठं आव्हान आहे. (India Corona Cases Update 368147 new COVID 19 case)
संबंधित बातम्या :