देशात तिसऱ्या लाटेची घंटा वाजतेय? नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, सक्रिय रुग्णसंख्या 3.68 लाखांवर
गेल्या 24 तासात भारतात 45 हजार 083 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 460 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 840 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवाराच्या तुलनेत शनिवारी देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. शनिवारी देशभरात 45 हजार 83 रुग्णांची नोदं झाली आहे. कालच्या दिवसात 460 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 45 हजार 083नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 460 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 840 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
COVID19 | India reports 45,083 new cases, 460 deaths and 35,840 recoveries in the last 24 hours; active caseload 3,68,558
Recovery Rate currently at 97.53% pic.twitter.com/4rPH44bS1f
— ANI (@ANI) August 29, 2021
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 63 कोटी 09 लाख 17 हजार 927 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
#IndiaFightsCorona:#COVID19Vaccination Status (As on 29th August, 2021, 8:00 AM)
✅Total vaccine doses administered (so far): 63,09,17,927
✅Vaccine doses administered (in last 24 hours): 73,85,866#We4Vaccine #LargestVaccinationDrive@ICMRDELHI @DBTIndia pic.twitter.com/4lQCPUWaDm
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 29, 2021
केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या
देशात 45 हजार 83 रुग्ण आढळले आहेत त्यापैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळ राज्यामध्ये आढळले आहेत. केरळमध्ये 31 हजार 265 रुग्ण आढळले तर 153 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात 4 हजार 831 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या काही कमी होत नसल्याचं चित्र आहे. शनिवारी राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले 4 हजार 831 रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे 126 व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 64 लाख 52 हजार 273 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 37 हजार 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
आरोग्य विभागाच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी 4 हजार 455 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 62 लाख 59 हजार 906 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.02 वर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.12 टक्केंवर पोहोचला आहे. सध्या 2 लाख 92 हजार 530 व्यक्ती होम क्वारंटाईन असून 2 हजार 357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
इतर बातम्या:
भारतात झायडस कॅडिला लसीच्या वापरास मंजुरी, आपत्कालीन वापरास DCGI कडून मंजुरी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने धाकधूक, राज्यात एका दिवसात 216 कोरोनाबळी, मृत्यूदरातही वाढ
India Corona Report New 45,083 Corona Cases increased in the last 24 hours 460 died