India Corona Update : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोना लसीसह अन्य महत्वाच्या मागण्या

राज्यातील संसर्गाचा धोका ओळखून त्यांना लसीचा पुरवठा केला जावा. तसंच अन्य कंपन्यांच्या लसींचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

India Corona Update : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोना लसीसह अन्य महत्वाच्या मागण्या
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं पंतप्रधान मोदींना पत्र
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 9:28 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा विळखा वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. लसीकरणासाठी वयाची अट न घालता गरज ओळखून या मोहिमेचा विस्तार केला जावा, अशी प्रमुख मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केलीय. तसंच राज्यातील संसर्गाचा धोका ओळखून त्यांना लसीचा पुरवठा केला जावा. तसंच अन्य कंपन्यांच्या लसींचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. (Sonia Gandhi’s letter to PM Narendra Modi, supply of corona vaccine and other important demands)

‘गरीबांच्या खात्यात महिना 6 हजार रुपये द्या’

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उचललेलं कठोर पाऊल लक्षात घेता गरीबांना महिन्याला 6 हजार रुपये मदत स्वरुपात द्यावी अशी महत्वाची मागणीही त्यांनी केलीय. त्याचबरोबर मोठ्या शहरातून आपल्या घरी परतणाऱ्या लोकांसाठी वाहतुकीची व्यवस्था करावी, असंही सोनिया यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

‘लस निर्मितीची गती वाढवा’

सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा हवालाही आपल्या पत्रात दिला आहे. लसीकरण ही एक मोठी अपेक्षा आहे. मात्र, ही खेदाची बाब आहे की, अनेक राज्यांमध्ये पुढील 3 ते 5 दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे. अशावेळी आपल्याला देशात बनवल्या जाणाऱ्या लसनिर्मितीची गती वाढवणं आणि अन्य लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्याची गरज असल्याचंही सोनियांनी आपल्या पत्रात म्हटलंय. संसर्गाची गंभीर स्थिती पाहता रात्रीची संचारबंदी यासह अनेक कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. अशावेळी देशातील गरीब लोकांच्या खात्यात 6 हजार रुपये मासिक मदत टाकण्याची मागणीही केली आहे.

संबंधित बातम्या :

Corona Vaccination : केंद्र सरकारकडून रशियाच्या Sputnik V लसीला मंजुरी, लवकरच लसीकरणाला सुरुवात

टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींची खोचक टीका

Sonia Gandhi’s letter to PM Narendra Modi, supply of corona vaccine and other important demands

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.