31 मे पासून दिल्लीत अनलॉक, कारखाने, बांधकामांना परवानगी, महाराष्ट्रात काय स्थिती?

लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे हळूहळू अनलॉकिंग केलं जाईल, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल यांनी म्हटलंय.

31 मे पासून दिल्लीत अनलॉक, कारखाने, बांधकामांना परवानगी, महाराष्ट्रात काय स्थिती?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 3:23 PM

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर आता देशातील काही भागात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 31 मे पासून अनलॉकिंगला सुरुवात होणार आहे. मोठ्या कष्टाने आणि कठीण प्रसंगांमधून कोरोनावर नियंत्रण मिळू शकलं. पण लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे हळूहळू अनलॉकिंग केलं जाईल, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल यांनी म्हटलंय. (Unlocking starts from May 31 in the capital Delhi)

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या 24 तासांतील संसर्गाची टक्केवारी 1.5 टक्के राहिली आहे. तर दिवसभरात 1 हजार 100 नवे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती केजरीवाल यांनी दिलीय. तसंच केजरीवाल यांनी दिल्लीवासियांचं कौतुकही केलंय. कोरोनाविरोधातील लढाईन दिल्लीकरांच्या मेहनतीमुळेच दिल्लीची स्थिती वेगाने सुधारत आहे. लॉकडाऊननंतर आता हळूहळू अनलॉकसाठी तयार आहेत. बांधकाम आणि कारखान्यांना सोमवारपासून परवानगी दिली जाईल, अशी माहिती केजरीवाल यांनी दिलीय.

कामगारांवर विशेष लक्ष द्यावं लागेल

अनलॉकिंग करताना आपल्याला या पक्रियेत बिगारी कामगार, कष्टकरी, प्रवासी कामगारांवर सर्वात प्रथम लक्ष केंद्रीत करावं लागेल. हे कामगार बांधकाम क्षेत्रात आणि कारखान्यात काम करतात. त्यामुळे बांधकाम क्षेत्र आणि कारखान्यांना केजरीवाल यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

1. कारखान्याच्या परिसरात मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रॉडक्शन यूनिट चालवण्यासाठी परवानगी असेल.

2. कंन्स्ट्रक्चर साईटवर कामगारांना बांधकामास परवानगी देण्यात येईल.

महाराष्ट्रात लॉकडाऊन 15 दिवस वाढणार

राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असं सुतोवाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. त्यामुळे 1 जूनपासून पुन्हा 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांची संवाद साधताना हे सुतोवाच केलं. राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेलं पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक

पुणे महापालिकेचा आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ उपक्रम, पहिल्या टप्प्यात 5 मोबाईल व्हॅन उपलब्ध

Unlocking starts from May 31 in the capital Delhi

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.