कोरोनाचे नवे प्रकार आणि लाटांपासून वाचण्याचे 2 उपाय, वाचा तज्ज्ञ काय सांगतात?

सावधगिरी आणि कोरोना लसीकरण हे दोन उपाय कोरोनाच्या सर्व म्यूटेंटवर आणि भविष्यात येणाऱ्या कोरोना लाटांपासून वाचण्याचा उपाय आहे.

कोरोनाचे नवे प्रकार आणि लाटांपासून वाचण्याचे 2 उपाय, वाचा तज्ज्ञ काय सांगतात?
corona mask
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 11:35 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनाची सध्य स्थिती आणि येणाऱ्या लाटांपासून कसं वाचावं? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. देशवासियांच्या शंका दूर करत तज्ज्ञांनी कोरोनापासून बचावासाठी काही महत्वाच्या बाबी सांगितल्या आहे. त्यात सावधगिरी आणि कोरोना लसीकरण हे दोन उपाय कोरोनाच्या सर्व म्यूटेंटवर आणि भविष्यात येणाऱ्या कोरोना लाटांपासून वाचण्याचा उपाय आहे. (Caution and vaccination are two ways to prevent corona)

देशात लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यास कोरोनाची येऊ घातलेली तिसरी लाट ही सध्याच्या दुसऱ्या लाटेपेक्षा कमी नुकसानकारक ठरेल, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे हे उपाय तुम्हाला कोरोनापासून दूर ठेवू शकतात.

तिसरी लाट रोखली जाऊ शकते?

देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं विधान बुधवारी केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. राघवन यांचं हे मार्गदर्शन केंद्र आणि राज्य सरकारांना उपयुक्त ठरणारं आहे.

आपण कठोर पावलं उचलली, तर तिसरी लाट येऊ शकणार नाही. स्थानिक, राज्य, जिल्हा आणि शहर पातळीवर कोरोना संदर्भातील सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी करतो, यावर ते अवलंबून असेल, असं राघवन यांनी म्हटलंय. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर कठोर पावलं उचलण्याबरोबरच कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचंही राघवन म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ बंगळुरूचे एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. गिरीधर बाबू यांच्यामते, थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती सर्वाधिक असते. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरूवातीला कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे त्यापूर्वी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. तसेच पुढील काळात तरुण लोकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

ऑक्सिजन टँकर काळाबाजारावर अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन, गडकरींचा थेट विशाखापट्टनमला, पहा काय घडलं?

रात्री अचानक तब्येत बिघडली, कर्जाचा डोंगर उभा करुन आईला मृत्यूच्या दारातून वाचवलं, डोळ्यांमधून पाणी आणणारी कहाणी

Caution and vaccination are two ways to prevent corona

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.