Drone | स्वदेशी ड्रोनच्या भारताच्या स्वप्नाला मोठा झटका, अखेर DRDO ला घ्या लागला नको तो निर्णय
DRDO | भारताच स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीच जे धोरण आहे, त्यासाठी हा एक झटका आहे. चीन या बाबतीत भारताच्या एक पाऊल पुढे आहे. भविष्याचा विचार करता भारतीय सैन्य दलांसाठी हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा होता. कारण भारताला चीन आणि पाकिस्तान या देशांचा शेजार लाभला आहे.
नवी दिल्ली : भारताला चीन आणि पाकिस्तानचा शेजार लाभला आहे. हे दोन्ही देश भारताचे प्रखर विरोधक आहेत. अधून-मधून या दोन्ही देशांबरोबर भारताचा संघर्ष होत असतो. अशा परिस्थितीत या दोन्ही देशांबरोबर कधीही दोन हात करण्यासाठी भारताला सज्ज राहण आवश्यक आहे. भारत शस्त्रांची मोठ्या प्रमाणात आयात करतो. पण अलीकडच्या काहीवर्षात भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर शस्त्रास्त्र निर्मितीवर भर दिला आहे. भारताने अनेक अत्याधुनिक मॉर्डन वेपन्सची यशस्वीरित्या निर्मिती केलीय पण एका प्रोजेक्टमध्ये भारताला अपयश आलय. भारताने मानवरहीत टेहळणी विमान निर्मितीचा सर्वात मोठा प्रोजेक्ट बंद केलाय. लष्करी गरजा पूर्ण करणार मानवरहित विमान निर्मितीमध्ये अपयश आलय. स्वदेशी तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या भारतासाठी हा एक झटका आहे. चीन असं विमान बनवण्याच्या बाबतीत भारताच्या एक पाऊल पुढे आहे.
‘तपस’ हा डीआरडीओचा प्रोजक्ट बंद करण्यात आलाय. फेब्रुवारी 2011 मध्ये या प्रोजेक्टला मान्यता देण्यात आली होती. या प्रोजेक्टची सुरुवातीची किंमत 1,650 कोटी रुपये होती. आता हा प्रोजेक्ट अधिकृतरित्या बंद झाला आहे. सरकारच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. भारतीय सैन्याने अलीकडेच सॅटकॉम हेरॉन मार्क-2 ड्रोन्सचा ताफ्यात समावेश केला. ही इस्रायली बनावटीची मानवरहित विमान आहेत. त्याचा उपयोग टेहळणी मिशन्ससाठी केला जातो.
प्रोजेक्टचा खर्च किती होता?
डीआरडीओच्या तपस प्रोजेक्टसाठी ऑगस्ट 2016 ची मुदत होती. तपस UAV च वजन, इंजिन आणि पेलोडमध्ये सुद्धा काही समस्या होत्या. या प्रकल्पाचा खर्च वाढून 1,786 कोटी झाला. तपस-201 ची दोनशे उड्डाण झाली. यात दोनवेळा हा विमान कोसळलं. अपेक्षित कामगिरी आणि निकष हे ड्रोन पूर्ण करु शकलं नाही. हे विमान 28 हजार फूट उंचीवर आणि सलग 18 तास उड्डाण करु शकत होतं. या विमानाकडून सलग 24 तास आणि 30 हजार फुटावरुन उड्डाणाची अपेक्षा होती. तपस प्रोजेक्ट अशा प्रकारे बंद होण्यावरुन काही वाद आहेत. काही दुसऱ्या हितसंबंधांमुळे हा निर्णय झाल्याचा आरोप होतोय. भारतीय सैन्य दलांकडे इस्रायली बनावटीची हेरॉन ड्रोन्स आहेत. शत्रूच्या प्रदेशातील दूरवर भागावर लक्ष ठेवणं ही या ड्रोन्सची जबाबदारी आहे.