AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Bangladesh : चीनला निमंत्रण देणाऱ्या बांग्लादेशला भारताने दिला जबर झटका, त्यांचं मोठं नुकसान अटळ

India-Bangladesh : बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे 26 ते 29 मार्च दरम्यान चीन दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी ईशान्य भारतासंदर्भात एक वक्तव्य केलं. त्याची मोठी किंमत बांग्लादेशला चुकवावी लागली आहे. भारताने थेट निर्णय घेऊन दणका दिला आहे.

India-Bangladesh : चीनला निमंत्रण देणाऱ्या बांग्लादेशला भारताने दिला जबर झटका,  त्यांचं मोठं नुकसान अटळ
Muhammad YunusImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 09, 2025 | 4:27 PM
Share

शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर शेजारच्या बांग्लादेशात भारताविरोधात कारवाया वाढल्या आहेत. तिथल्या अंतरिम युनूस सरकारने अनेक निर्णयातून भारतविरोध दाखवून दिलाय. नुकताच बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी चीनचा दौरा केला. तिथे त्यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेच विषय बनलं आहे. भारतानेही बांग्लादेश बद्दल एक निर्णय घेतला आहे. याकडे प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जात आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्नुसार भारताने बांग्लादेशच्या एक्सपोर्ट कार्गोसाठी ट्रांसशिपमेंटची सुविधा समाप्त केली आहे. या संदर्भात सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टमकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. भारताच्या या निर्णयामुळे बांग्लादेशचा भूतान, नेपाळ आणि म्यानमारसोबतचा व्यापार बाधित होऊ शकतो.

8 एप्रिलला CBIC कडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं. त्यात म्हटलय की, 29 जून 2020 च पहिलं परिपत्रक रद्द करण्यात आलय. ट्रांसशिपमेंट सुविधेद्वारे भारतीय बंदर आणि विमानतळावरील लँड कस्टम स्टेशन्सचा वापर करुन बांग्लादेशला तिसऱ्या देशाला निर्यात करता येत होती. त्यामुळे बांग्लादेशचा भूतान, नेपाळ आणि म्यानमार या देशांसोबत सहज व्यापार सुरु होता. पण भारताने आता सुविधा बंद केल्यामुळे बांग्लादेशला फटका बसू शकतो.

मोहम्मद युनूस यांचं कुठलं वक्तव्य बांग्लादेशला भोवलं?

बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे 26 ते 29 मार्च दरम्यान चीन दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांबद्दल एक वक्तव्य केलं. भारताच्या ईशान्येकडची सात राज्य लँडलॉक्ड म्हणजे चारही बाजूंनी जमिनीनी घेरलेली आहेत. त्यांना थेट सागरापर्यंत जाण्याचा मार्ग नाही. या संपूर्ण क्षेत्राचे समुद्रमार्गे आम्हीच पालक आहोत. चिनी अर्थव्यवस्थेच्या विस्ताराची इथे मोठी संधी आहे असं वक्तव्य मोहम्मद युनूस यांनी केलं. बांग्लादेशच सध्याच धोरण चीनकडे झुकलेलं आहे. मोहम्मद युनूस यांचं हे विधान रणनितीक दृष्टीने भारतासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. भारत सरकारने ट्रांसशिपमेंट सुविधा संपवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला युनूस यांच्या वक्तव्याची सुद्धा किनार असू शकते.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.