अंतराळात भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन तयार होणार? कोणत्या ग्रहाची केली निवड? इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी दिली महत्वाची माहिती

नवीन वर्षातील पहिली मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. चांद्रयान-३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला एक दिशा, एक ध्येय दिले आहे. अमृतकाळात आपल्याला काय साध्य करायचे आहे याची तयारी करावी लागेल असे ते म्हणाले.

अंतराळात भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन तयार होणार? कोणत्या ग्रहाची केली निवड? इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी दिली महत्वाची माहिती
ISRO CHIEF SOMNATH AND PM NARENDRA MODI
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 11:52 PM

नवी दिल्ली | 07 जानेवारी 2024 : चांद्रयान-३ लँडर विक्रमची हॉप चाचणी, प्रोपल्शन मॉड्यूलला चंद्रावरून पृथ्वीच्या कक्षेत परत आणणे आणि आता आदित्य मिशनला हॅलो ऑर्बिटमध्ये (लॅग्रेंज-१) ठेवणे हे भविष्यातील तयारीचा एक भाग आहे अशी माहिती इस्रो (ISRO) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी एका विशेष मुलाखती दरम्यान दिली. भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन डिझाईन करून ते अवकाशात स्थापित करणे. ते ऑपरेट करणे. हे एक अतिशय आव्हानात्मक मिशन आहे. यासाठी मंगळ ग्रहाचा विचार करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. याशिवाय 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवायचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. अशा मोहिमांमध्ये यश मिळाल्याने भविष्यातील गुंतागुंतीच्या मोहिमांमध्ये आत्मविश्वास वाढतो असेही एस. सोमनाथ म्हणाले.

गेल्या सहा महिन्यांमध्ये आम्ही 3 विज्ञान मोहिमा सुरू केल्या. रिपीट सॅटेलाइट बनवून काही फायदा नाही. आपल्याला त्यात नाविन्य आणावे लागेल. नवीन कल्पना आणाव्या लागतील. त्यामुळे तांत्रिक प्रगती सुरूच राहील. तंत्रज्ञान जस जसे प्रगत होते तस तसे खर्च कमी होतात. ऑटोमेशन होते, बहुतेक सिस्टम या स्वयंचलित असतात. त्यामुळे बुद्धिमत्ता विकसित होते, कार्यक्षमता वाढते असे ते म्हणाले.

चांद्रयान-३ आणि आदित्य मिशनमध्ये बरेच ऑटोमेशन झाले. रिमोट सेन्सिंग आणि कम्युनिकेशन सॅटेलाइटमध्येही या तांत्रिक सुधारणांचा लाभ आम्हाला भविष्यात मिळेल. विज्ञानाबाबत देशात नवी लाट निर्माण झाली आहे. चांद्रयान मोहीम ही खूप भावनिक मोहीम आहे. चांद्रयान-३ च्या यशाने लहान मुले, तरुण किंवा देशातील प्रत्येक नागरिक आनंदी झाला. भारताने स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून ही कामगिरी केली असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला आणखी अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले.

आपल्याकडेही गुंतागुंतीची मोहीम पार पाडण्याची ताकद आहे. त्यामुळे मुले विज्ञान आणि अभियांत्रिकीकडे आकर्षित होतील. शेवटी त्याचा देशाला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करून ते पुढे म्हणाले, आदित्य एल-१ हे मिशन अनेक वर्षांपासून सुरू होते. हे एक अद्वितीय मिशन आहे. त्याची योजना 2009 मध्ये बनवण्यात आली आणि आता ती पूर्ण झाली.

विज्ञान मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी ही एक दोन वर्षांची बाब नाही. आदित्य मिशनमधील सर्व उपकरणे भारतात बनवली गेली. आम्ही परदेशातून काही घेतले नाही. कोणतेही तंत्र घेतले नाही. आमचे नियोजन जागतिक दर्जाचे आहे अशा तीन महत्त्वाच्या गोष्टी यामधून देशासमोर आल्या असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.