AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाला तोंड फुटणार? काऊंटडाऊन सुरू… PM मोदी यांच्या त्या चार बैठका, पाकिस्तान थरथरला

India-Pakistan Tension : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या हल्ल्यानंतर पहिल्यांदा कॅबिनेट बैठक घेतील. तर कॅबिनेट सुरक्षा समिती, राजकीय आणि आर्थिक संबंधासंबंधीच्या तीन बैठकातही मोदी सहभागी होतील. त्यानंतर पाकिस्तानचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे...

युद्धाला तोंड फुटणार? काऊंटडाऊन सुरू... PM मोदी यांच्या त्या चार बैठका, पाकिस्तान थरथरला
काऊंटडाऊन सुरू, पाकिस्तान थरथरलाImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 30, 2025 | 9:14 AM
Share

दक्षिम काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. हल्ल्यानंतर दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तीनही सैन्य दलाचे प्रमुख, एनएसए अजित डोभाल, सीडीएस अनिल चौहान आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उच्चस्तरीय बैठक झाली. आज, बुधवारी पंतप्रधान मोदी हे हल्ल्यानंतर पहिल्यांदा कॅबिनेट बैठक घेत आहेत. तर त्यापूर्वी ते कॅबिनेट सुरक्षा समिती, राजकीय आणि आर्थिक संबंधासंबंधीच्या तीन बैठकींच्या अध्यक्षस्थानी असतील.

पाकिस्तानचे काऊंटडाऊन सुरू

पाकिस्तानचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आजच्या चार बैठका या पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत केव्हाही हल्ला करणार या भीतीने पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानला घाम फुटला आहे. पाकिस्तानच्या दाव्यानुसार, येत्या 24 ते 36 तासात भारतीय लष्कर थेट कारवाई करेल. मोदी यांनी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी तीनही सैन्य दलाला सूट दिली आहे.

कॅबिनेटसह इतर तीन महत्त्वपूर्ण बैठका

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदा कॅबिनेटची बैठक घेतली. पंतप्रधान मोदी हे कॅबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटी (CCS), कॅबिनेट कमेटी ऑन पॉलिटिकल अफेयर्स (CCPA) आणि कॅबिनेट कमेटी ऑन इकोनॉमिक अफेयर्स (CCEA) या बैठकीत सहभागी होतील. या तीन ही समित्यांमध्ये अनेक केंद्रीय मंत्री सहभागी होतील. आज या बैठकीनंतर पाकिस्तानचे भवितव्य ठरणार आहे.

पाकिस्तानला करारा जबाब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही सैन्य दलाचे प्रमुख, एनएसए,सीडीएस आणि संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यात दहशतवाद्यांवर कारवाईसाठी त्यांना सूट देण्यात आली. त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात येणार नसल्याचे समोर येत आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल 90 मिनिटं ही बैठक झाली. दहशतवादाला ठोस उत्तर देणे हा राष्ट्रीय संकल्प असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शत्रूला प्रत्युत्तर देण्याची पद्धत, लक्ष्य आणि वेळ याबद्दल निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.