देशात कोरोना रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ, कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखाच्या दिशेने

कालच्या दिवसात (गुरुवार 9 जुलै) देशात 26 हजार 506 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 93 हजार 802 वर गेला आहे.

देशात कोरोना रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ, कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखाच्या दिशेने
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 10:57 AM

नवी दिल्ली : देशभरात एका दिवसात सापडणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचे नवनवे विक्रम रचले जात आहेत. गुरुवारच्या दिवसात भारतात 26 हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडले. पहिल्यांदाच एका दिवसातील रुग्णसंख्येने फक्त 25 नाही, तर थेट 26 हजाराचा टप्पा ओलांडला. (India reports highest single-day spike in Corona Patients)

कालच्या दिवसात (गुरुवार 9 जुलै) देशात 26 हजार 506 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 93 हजार 802 वर गेला आहे.

7 जुलैला भारताने सात लाख रुग्णांचा आकडा पार केला होता. मात्र याच वेगाने नवीन रुग्ण आढळत राहिल्यास देशात पुढील 24 तासात आठ लाख रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणजेच अवघ्या चार दिवसात एक लाखाने रुग्णसंख्या वाढेल.

हेही वाचा : Mumbai Corona | आता मुंबईत चीनपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त

गेल्या 24 तासात देशात 475 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 21 हजार 604 कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

भारतात सध्या 2 लाख 76 हजार 685 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 4 लाख 95 हजार 513 जण कोरोनामुक्त झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

भारतात सलग सहाव्या दिवशी (24 तासात) 21 हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आणि चारशेपेक्षा अधिक कोरोनाबळी गेले आहेत. गेल्या आठवड्याभरात पाचव्यांदा एका दिवसात सर्वाधिक सापडण्याचा विक्रम नोंदवला गेला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

रविवारी 1.8 लाख, सोमवारी 2.41 लाख, तर मंगळवारी 2.62 लाख जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या. वाढत्या टेस्टमुळे अधिक रुग्ण सापडत असल्याचा कयास बांधला जात आहे.

नुकताच भारत सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या जागतिक यादीत तिसऱ्या स्थानावर गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये 17 लाख 59 हजार 103, तर सर्वोच्च स्थानी असलेल्या अमेरिकेत तब्बल 32 लाख 19 हजार 999 रुग्ण आहेत.

(India reports highest single-day spike in Corona Patients)

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.