AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता, कारण वाचा…

प्रजासत्ताक दिनाच्या परेड साठी यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे, यामागचं नेमकं कारण काय? वाचा...

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता, कारण वाचा...
| Updated on: Dec 21, 2022 | 10:24 AM
Share

नवी दिल्ली : दरवर्षी प्रजासत्ताक दिनी (Republic Day Parade) त्या-त्या राज्यांची संस्कृती दर्शवणारे चित्ररथ सादर केले जातात. महाराष्ट्रही विविध थिमवर आधारित चित्ररथ सादर करत असतो. पण यंदाच्या प्रजासत्ताक दिनी परेडसाठी यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाहीये,  त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताकदिनी परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) दिसण्याची शक्यता कमी आहे.

राज्यांची संख्या अधिक पण चित्ररथ दरवेळी ठराविक संख्येतच निवडावे लागतात त्यामुळे रोटेशन पद्धतीनुसार ही निवड होत असते. त्यामुळे यंदा महाराष्ट्राला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

अंतिम 14 राज्यांमध्ये यावेळी तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ या भाजपशासित नसलेल्या राज्यांचाही समावेश आहे. मागच्या वेळी चित्ररथाचा समावेश नसल्याने तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ने आक्रमक भूमिका घेतलेली होती

गेल्या वर्षी महाराष्ट्राने जैवविविधता आणि मानके या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथाला लोकपसंती मध्ये पहिला क्रमांक मिळाला होता.

याआधी 2020 मध्ये देखील परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. आता दोन वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये दिसणार नाही.

1971 ते 2022 या 51 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 38 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडवले आहे.

यासाठी महाराष्ट्राला 12 वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कारही मिळाला आहे.

यंदा मात्र महाराष्ट्राला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.