AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची ‘सिंधू’ पाणी वाटप कराराला स्थगिती; पाकिस्तानचा थयथयाट, गृहमंत्री म्हणाले आम्ही युद्धासाठी तयार

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारत सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी स्थगित करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारताची 'सिंधू' पाणी वाटप कराराला स्थगिती; पाकिस्तानचा थयथयाट, गृहमंत्री म्हणाले आम्ही युद्धासाठी तयार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 26, 2025 | 9:59 PM
Share

मंगळवारी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. एवढंच नाही तर अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. भारताच्या या कारवाईनंतर आता पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. आता पाकिस्तानच्या गृहमत्र्यानं युद्धाची धमकी दिली आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारत सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी स्थगित करू शकत नाही, कारण त्याला वर्ल्ड बँक गॅरंटर आहे, असं मोहसिन नकवी यांनी म्हटलं आहे, आणि जर भारतानं सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत असही नकवी यांनी म्हटलं आहे.

यापू्र्वी बिलावत भुट्टो यांनी देखील सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मी सिंधू नदीच्या काठावर उभं राहून स्पष्ट शब्दात सांगतो की सिंधू नदी आमची आहे, आणि आमचीच राहणार. या नदीमधून एकतर आमचं पाणी वाहील किंवा त्यांच्या रक्ताचे पाट वाहातील जे आमचं पाणी आमच्यापासून हिसकावतील असं भुट्टो यांनी म्हटलं होतं.

भारताची फक्त लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे सिंधू नदीचं पाणी कोणाला मिळणार हे ठरवण्याचा अधिकार त्यांना मिळत नाही. पाकिस्तानची जनता शूर आहे, आम्ही सर्व एकत्र होऊन या समस्येचा सामना करू, भारताला उत्तर देण्यासाठी आमच्या सैन्याची फौज सिमेवर सज्ज आहे, शत्रूंची नजर आमच्या पाण्यावर आहे, मात्र आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, संपूर्ण देश या विरोधात एकजूट होईल.

दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे, सिंधू नदीच्या जल वाटपाचा करार स्थगित करण्यात आला आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले आहेत. भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात परतण्याचे आदेश देण्यात आले असून, देशभरात त्यांचा शोध सुरू आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.