IAF | चीन-पाकिस्तानची झोप उडवणारी बातमी, डायरेक्ट 3 लाख कोटीची शॉपिंग

Indian Air Force | चीन-पाकिस्तान भारतापासून जरा बचके, इंडियन एअर फोर्सने मोठी तयारी सुरु केलीय. लवकरच भारताची ती ताकत दिसून येईल. चीन-पाकिस्तानसोबत एकाचवेळी युद्ध लढण्यासाठी किती स्क्वाड्रन हव्यात? त्या बद्दलही जाणून घ्या.

IAF | चीन-पाकिस्तानची झोप उडवणारी बातमी, डायरेक्ट 3 लाख कोटीची शॉपिंग
IAF
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 11:00 AM

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठी इंडियन एअर फोर्स विशेष तयारी करतेय. लवकरच एअर फोर्सच्या ताफ्यात अधिक अत्याधुनिक उपकरणांचा समावेश होईल. त्याशिवाय युद्ध लढण्याच्या रणनितीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. एअर चीफ मार्शल वीआर चौधरी यांनी मंगळवारी इंडियन एअर फोर्सच्या रणनितीक योजनांचा खुलासा केला. पुढच्या सात ते आठ वर्षात IAF मध्ये 2.5 ते 3 लाख कोटीची फायटर विमाने, हेलिकॉप्टर्स, मिसाइल आणि रडारचा समावेश होईल. चीनला लागून असलेल्या 3,488 किलोमीटर लांबीच्या नियंत्रण रेषेवरील स्थितीवर लक्ष ठेवण ही एअर फोर्सची मुख्य रणनिती आहे. एप्रिल-मे 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आलं. हिंसक संघर्ष झाला. चीनने भारताजवळच्या सीमेवर आपले एअरबेस वाढवले आहेत. रडार आणि जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची तैनाती केली आहे.

प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी इंडियन एअर फोर्सने एलएसीवर लेवल ट्रान्सपोर्टेबल राडार (LLTRs) सह एसएजीडब्ल्यू आणि रडार तैनात केलेत. शत्रू प्रदेशात खोलवर नजर ठेवता यावी, यासाठी रडार यंत्रणा अधिक अत्याधुनिक केली जात आहे. त्याचवेळी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सकडे IAF च्या तुलनेत फायटर प्लेन आणि बॉम्बर्सची संख्या चारपट जास्त आहेत. पाकिस्तान आता चिनी बनावटीची जेएफ-17 ‘थंडर’ मल्टी पर्पज फायटर विमानांची निर्मिती करत आहे. त्याशिवाय 25 एडव्हान्स जे-10सी जेट सुद्धा घेत आहे. दोन्ही देश संयुक्त युद्धा सराव करतात. मागच्या महिन्यात उत्तर पश्चिम चीनमध्ये त्यांनी एकत्र ‘शाहीन’ हा युद्धसराव केला.

दोन देशांविरुद्ध एकाचवेळी लढण्यासाठी किती स्क्वाड्रन हव्या?

इंडियन एअर फोर्स चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, असा विश्वास एअर फोर्स प्रमुख एसीएम चौधरी यांनी व्यक्त केला. IAF ची हवाई युद्धाची क्षमता वाढवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. यासाठी पुढच्यावर्षी 1.72 लाख कोटीचे करार केले जातील. फेब्रुवारी 2021 मध्ये HAL बरोबर करार झालाय. त्यांना 83 तेजस विमानांची ऑर्डर दिलीय. त्याशिवाय 97 तेजस मार्क-1 ए फायटर विमान खरेदी करण्यात येणार आहेत. फायटर जेट्सच्या स्क्वाड्रन कमी आहेत. त्यामुळे स्वेदशी तेजस फायटर विमानांची इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. सध्या 31 स्क्वाड्रन आहेत. चीन-पाकिस्तानशी एकाचवेळी लढण्यासाठी 42 स्क्वाड्रन गरजेच्या आहेत.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.