Jammu Kashmir Poonch encounter : पुंछमध्ये गोळीबार सुरुच, 13 वर्षानंतर सर्वाधिक काळ सर्च ऑपरेशन, अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी सैन्यदलाचं प्लॅनिंग

जम्मू काश्मीरमधील पुंछमधील राजौरीच्या पीर पांजाल टेकड्यांमध्ये दहशतवाद्यांनी 11 ऑक्टोबरला गोळीबार केला होता. या हल्ल्यात भारताचे चार जवान आणि एक अधिकारी शहीद झाले होते.

Jammu Kashmir Poonch encounter : पुंछमध्ये गोळीबार सुरुच, 13 वर्षानंतर सर्वाधिक काळ सर्च ऑपरेशन, अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी सैन्यदलाचं प्लॅनिंग
पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा पोस्ट ऑफीसवर हल्ला
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 4:44 PM

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पुंछमधील राजौरीच्या पीर पांजाल टेकड्यांमध्ये दहशतवाद्यांनी 11 ऑक्टोबरला गोळीबार केला होता. या हल्ल्यात भारताचे चार जवान आणि एक अधिकारी शहीद झाले होते. भारतीय सैन्य दलानं तेव्हापासून दहशतवाद्यांविरोधात सुरु केलेलं ऑपरेशन आजही सुरु आहे. जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भारतीय सैन्य दल आणि दहशतवादी यांच्यातील चकमक 12 व्या दिवशी देखील सुरु आहे.

भारताचे आतापर्यंत 9 जवान शहीद

दहशतवाद्यांनी भारताच्या जवानांवर गोळीबार केला त्या दिवशी पहिल्यांदा 4 जवान आणि एक अधिकारी शहीद झाले होते. तेव्हापासून भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांविरोधात सुरु केलेल्या कारवाईचा आज 12 वा दिवस आहे. पुंछमध्ये सुरु असलेल्या सैन्यदलाच्या आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत भारताचे आतापर्यंत 9 जवान शहीद झाले असून त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नागरिकांना घरात थांबण्याचं आवाहन

पुछं जिल्ह्यात सैन्य दल आणि स्थानिक प्रशासनाच्यावतीनं नागरिकांना घराबाहेर पडू नये, घरीच थांबावं असं सांगण्यात आलं आहे. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात गोळीबाराचा आवाज येत असल्यानं आणि मोठी स्फोटक डागली जात असल्यानं मशीदीतून नागरिकांना घरात थांबण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागरिकांनी त्यांच्याकडे असणारे पाळीव प्राणी देखील बाहेर सोडू नयेत असं सांगण्यात आलंय. यामुळे भारतीय सैन्यदल दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोठा प्लॅन करत असल्याचं समजते.

लष्कर प्रमुख एम एम नरवणेंची भेट

दहशतवाद्यांनी 11 ऑक्टोबरच्या रात्री हल्ला केला तेव्हा भारताचे पाच जवान शहीद झाले होते. त्यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश होता. तर, 14 ऑक्टोबरला दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आणखी चार जवानांना वीरमरण आलं होतं त्यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश होता. मंगळवारी भारताचे लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांनी भेट पुंछला भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली होती. लष्कर प्रमुखांनी जम्मू काश्मीरमधील चकमकीच्या ठिकाणी भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती.

13 वर्षानंतर सर्वाधिक काळ चाललेली चकमक

2009 मध्ये पुंछ जिल्ह्यात नऊ दिवस दहशतवादी आणि सैन्य दलामध्ये चकमक सुरु होती. 1 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान ही चकमक सुरु होती. त्यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर, भारताचे चार जवान त्यावेळी शहीद झाले होते. नऊ दिवसानंतर ते ऑपरेशन थांबलं होतं. 13 वर्षांनंतर पुंछ जिल्ह्यात 12 व्या दिवशी ऑपरेशन सुरु आहे. सुरणकोट तालुक्यातील डेरा की गली भागात ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली होती.

11 किमी पर्यंत माध्यमांना प्रवेश बंदी

भारतीय सैन्याकडून जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी ड्रोन आणि आधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात येत आहे. ऑपरेशन सुरु असलेल्या ठिकाणापासून 11 किलोमीटरच्या परिघात माध्यमांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

दोन महिन्यांपासून दहशतवादी दबा धरुन बसले

पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून दहशतवादी दबा धरुन बसल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं प्रसिद्ध झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे विविध गट जंगलात कार्यरत असल्याची माहिती आहे. पुंछ राजौरी भागात ऑगस्ट महिन्यापासून एन्काऊंटर्स सुरु आहेत. 6 ऑगस्टला दोन दहशतवाद्यांचा, तर, 13 सप्टेंबरला एका दहशतवाद्याचा खात्मा कण्यात आला होता.

लष्कर ए तोएबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडेलाचा खात्मा

जम्मू -काश्मीरमध्ये लष्कराच्या नऊ जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला रविवारी (17) मोठं यश आलं होतं. सैनिकांकडून लष्कर ए तोयबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडेला याला कंठस्नान घालण्यात आलं.

इतर बातम्या:

Jammu Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, लष्कर ए तोएबाचा कमांडर ठार

जम्मू काश्मीरच्या पुंछ राजौरीत सातव्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु, आतापर्यंत सैन्यदलाचे 9 जवान शहीद

Indian Army continue on twelve day search operation against terrorists who present forest of Jammu and Kashmir poonch rajouri

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.