High tech Indian Army: AK-203 रायफल्स, एलएसीवर ड्रोन्स, पैंगॉग लेकमध्ये लढाऊ बोट, निपुण माईन्स आणि बरंच काही.. सैन्यदलाला नेमकी कोणती मिळाली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे?

भारतीय सैन्यदलाला देण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांमुळे सैन्यदलाचे मनोबल उंचावरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात शत्रुंशी लढा देताना ही नवी हत्यारे अधिक उपयुक्त ठरणारी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

High tech Indian Army: AK-203 रायफल्स, एलएसीवर ड्रोन्स, पैंगॉग लेकमध्ये लढाऊ बोट, निपुण माईन्स आणि बरंच काही.. सैन्यदलाला नेमकी कोणती मिळाली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे?
सैन्यदलाचे स्वदेशी आधुनिकीकरण Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 4:19 PM

नवी दिल्ली – सैन्यदलाच्या (Indian Army) आधुनिकीकरणात (modernization)देशाने एक पाऊल पुढे टाकले आहे. पाकिसतान आणि चीनच्या सीमेवरील वाढत्या आव्हानांचा विचार करता, सैन्याचे आधुनिकीकरण आता प्रत्यक्षात होताना दिसते आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी (Rajnath Singh)आज दिल्लीमध्ये सैन्यदलाला नवी स्वदेशी हत्यारे सोपवली आहेत. त्यात एन्टी पर्सनल माईन निपुण, एके-203 रायफल, एफ अन्सास रायफल्स यांच्यासह ड्रोन्स यांचा समावेश आहे. ईईएल आणि अन्य भारतीय कंपन्यांनी ही हत्यारे विकसीत केलेली आहेत. या कार्यक्रमादरम्यान ही सगळी हत्यारे सैन्यदालाला सुपूर्द करण्यात आली, तसेच नव्या एके 203 रायफल आणि त्यामुळे सैन्यदलाला होणाऱ्या फायद्याचे सादरीकरणही सैनिकाकडून प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले.

संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरण वाढवण्याचे प्रयत्न

संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाला प्रोत्साहन आणि गती देण्यासाठी केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले, असे लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांनी सांगितले. या नव्या स्वदेशी हत्यांरांमध्ये माईन्स, प्रत्यक्ष समोरासमोर लढाई करण्याची हत्यारे, युद्धासाठी आवश्यक असलेली लढआऊ वाहने यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भारतीय सैन्यदलात भविष्यात लढाईसाठी जाणाऱा सैनिक कसा सज्ज असेल, त्याच्याकडे कोणती नवी हत्यारे असतील, त्याच्याकडे एके 203 रायफल कशी असेल याची माहिती प्रत्यक्षरुपात देण्यात आली. सैन्यदलाच्या फ्युचरिस्टिक इन्फेन्टी सोल्जर इन ए सिस्टिम (एस-इंसास) चे हे सादरीकरण होते.

लँडिंग क्राफ्ट असाल्टचे प्रात्यक्षिक

चीनला लागून असलेल्या सीमेच्या परिसरातील पेंगॉग लेकमध्ये तैनात असलेल्या लँडिंग क्राफ्ट असल़ल्टच्या क्षमतेचे प्रात्यक्षिकही यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दाखवण्यात आले. या लेकमध्ये सैन्यदलाच्या नबोटीमध्ये 35 लढाऊ सैनिक एकाचवेळी प्रवास करु शकणार आहेत, इतकेच नाही तर अत्यंत कमी वेळात ते या तलावात कोणत्याही ठिकाणी पोहचू शकणार आहेत. या बोटींची निर्मिती आणि देखरेख ही कॉर्प्स ऑफ इंडिनिअर्सच्या माध्यमातून करण्यात येणार ाहे. या बोटीही आज राजनाथ सिंह यांच्या हस्ते सैन्यदलाला देण्यात आल्यात.

वास्तविक नियंत्रण रेषेवर लक्ष ठेवण्यासाठी सैन्यदलाला ड्रोन्स

वास्तविक नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी आणि चिनी सैन्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन्सही भारतीय सैन्यदलाला आज देण्यात आले आहेत. या ड्रोन्समुळे दुर्गम भागातील शत्रूराष्टाच्या सैन्यदलावर नजर ठेवता येणे आता भारतीय सैन्याला सहज शक्य होणार आहे. तसेच यावेळी सैन्यदलाला, स्वदेशी लढाऊ वाहनेही यावेळी राजनाथ सिंह यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली आहेत.

सियाचिन ग्लेशियरमध्ये सैन्यतळावर 1 मेगावॅट सौर उर्जा योजनेचीही समर्पण

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज लडाखच्या सियाचिन ग्लेशियरजवळ असलेल्या परतापूर सैन्यतळावरील सैनिकांसाठी 1 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे समर्पणही करण्यात आले. या भागात असलेले वीज प्रकल्प हे प्रामुख्याने डिझेलवर अवलंबून असतात, हे डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी इंजिनिअर्सच्या कोअर ग्रुपमे हा सौर उर्जा प्रकल्प निर्माण केला आहे. या सौर उर्जा प्रकल्पातून या सैन्यतळाची विजेची गरज पूर्ण होणार आहे.

कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी – हरपाल सिंह

या कार्यक्रमात भारतीय सैन्याचे मुख्य इंजिनिअर लेफ्टनंट हरपाल सिंह हे उपस्थित होते. भारतीय सैन्यदल प्रमुखांच्या वतीने त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. देशासमोर असलेल्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्यदल सज्ज आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी सगळ्या देशाला दिले. वाळवंटी भाग असलेला पश्चिम पाकिस्तान असो वा सर्वाधिक उंचीवरील चीनला लागू असलेल्या सीमा असो, त्या सगळ्या परिसरात भारतीय सैन्यदल सक्षमपणे पाय रोवून उभे असल्याचे हरपाल सिंह यांनी यावेळी सांगितले. भारतीय सैन्यदलाला देण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांमुळे सैन्यदलाचे मनोबल उंचावरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात शत्रुंशी लढा देताना ही नवी हत्यारे अधिक उपयुक्त ठरणारी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.