आकाशातूनही घुसखोरी, काश्मिरात भारतीय सैन्यदलाने शस्त्रास्त्रे घेऊन येणारे ड्रोन पाडले, 7 बॉम्बही केले जप्त, ड्रोनच्या बॅटरीवर चिनी भाषा
या ड्रोनवर काही शस्त्रास्त्रेही बांधण्यात आली होती. ती शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या ड्रोनमधून 7 स्टिकी बॉम्बही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी बॉम्ब शोधक तपासाच्या मदतीने सुरु आहे, अशी माहिती कठुआच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पाकिस्तानातून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेतच. मात्र त्याचबरोबरच पाकिसातानातून येणारी शस्त्रास्त्र आता जमिनीवरुनच नव्हे तर थेट आकाशातूनही येत असल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानच्या हद्दीतून येणारे एक ड्रोन (shot down drone)खाली पाडले आहे. हरिया चक गावातील ही घटना आहे. ज्या भागात एक पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत शिरत होते. भारतीय जवानांनी (Indian Army)गोळीबारात हे ड्रोन खाली पाडले आणि ते ताब्यात घेतले आहे.
ड्रोनसोबत होती काही हत्यारे
या ड्रोनवर काही शस्त्रास्त्रेही बांधण्यात आली होती. ती शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या ड्रोनमधून 7 स्टिकी बॉम्बही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी बॉम्ब शोधक तपासाच्या मदतीने सुरु आहे, अशी माहिती कठुआच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहशतवादी एखादा मोठा घातपात रचण्याच्या तयारीत होते, मात्र सैन्यदलाच्या सक्रियतेमुळे दहशतवाद्यांचा कट उधळला गेला आहे.
ड्रोनच्या बॅटरीवर चिनी भाषा
हे ड्रोन पाकिस्तानातूनच भारतात येत असल्याची अधिकृत माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या ड्रोनला दोन बॅटऱ्या होत्या. यावर चिनी भाषेत काहीतरी लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या ड्रोनमध्ये चिनी बॅटऱ्यांचा वापर करण्यात आल्याचे दिसते आहे. या सगळ्याच्या तपासासाठी जम्मूतून यातील जाणकारांना पाचारणही करण्यात आले आहे.
ड्रोनबाबत महत्त्वाची माहिती
सध्या आपण जे ड्रोन वापरतो. ते तयार करण्याचे श्रेय मूळचे इराकचे असलेले अमेरिकी इंजिनिअर अब्राहम करीम यांना जाते. करीम यांनी पहिला ड्रोन इस्रायली सैन्यासाठी १९७३ साली तयार केले होते. करीम यांचे वय आता ८४ च्या पार आहे आणि ते सध्या उडणाऱ्या कारवर काम करीत आहेत. ड्रोन्सचा उपयोग अशा अवघड ठिकाणी करण्यात येतो ज्या ठिकाणी सामान्य माणूस पोहचू शकत नाही. त्याला अनमॅन्ड एरियल व्हेकल असेही म्हणण्यात येते. भारतात जायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनने ड्रोनचे पाच प्रकार निश्चित केले आहेत. याच नॅनो, मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि लार्ज अशी निश्चिती करण्यात आली होती. यात नॅनो २५० ग्रॅमपर्यँत, मायक्रो २५० ग्रॅम ते २ किलोपर्यंत, स्मॉल (२ किलो ते २५ किलो), मीडियम (२५ किलो ते १५० किलो) आणि लार्ज (१५० किलोहून जास्त) असे असते. देशात १ डिसेंबर २०१८ रोजी ड्रोन पॉलिसी लागू करण्यात आली. यात १८ वर्षांखालील कमी वयाची व्यक्ती ड्रोन उडवू शकणार नाही, असा नियम करण्यात आला आहे.