Garud Forces : चीनच्या सीमेवरील कुरापतींविरोधात भारताची ‘गरुड’ झेप! या कमांडोंनी भरवली शत्रूच्या मनात धडकी, वाचून तुम्हाला ही वाटेल अभिमान
Garud Forces : चीनच्या उरात धडकी भरवणारी भारताची गरुड सेना आहे तरी काय..
नवी दिल्ली : चीनच्या (China) पूर्व सीमेवरील कुरापती दिवसागणिक वाढत आहेत. आता अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) चीनच्या सैन्यांनी पुन्हा आगळीक केली. त्यामुळे भारताने सीमेवरील(Border Dispute) पाळत वाढवली आहे. चीनी सैन्याला धोबीपछाड देण्यासाठी भारतीय सैन्य दलाने गरुड कमांडो (Garud Commando) तैनात केले आहे. त्यामुळे चीन्यांच्या उरात धडकी भरली आहे. गरुड कमांडोंची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे.
मे 2020 मध्येच भारतीय वायुसेनेने गरुड विशेष सैन्य दलाला प्रत्यक्ष सीमावर्ती विशेष मोहिमेत सहभागी करुन घेतले होते. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये या सैन्य दलाने विशेष कामगिरी बजावली आहे. अनेक दहशतवाद्यांना या विशेष पथकाने कंठस्नान घातले आहे.
या विशेष सैन्य दलाकडे स्वदेशी बनावटीचे AK-203 हे खतरनाक शस्त्र आहे. तसेच अमेरिकी सिग सॉअर असॉल्ट रायफलने (AK-103) हे कमांडो तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे चीनी सैन्यांना आगळीक करणे महागात पडणार आहे.
Garud Spl Forces equipped with latest weaponry incl American Sig Sauer&Russian origin AK103 assault rifles.They’d be provided with latest Made-in-India AK-203 assault rifles in near future for specialist ops in counter insurgency&other roles:IAF officialshttps://t.co/0gZxT2cPgD
— ANI (@ANI) December 22, 2022
गरुड कमांडो जगातील सर्वात उंच युद्ध भूमीत चिनी सैन्यांवर बारीक नजर ठेऊन आहेत. या कमांडोंनी पाकिस्तानात विशेष प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनाही धुळ चारली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या मनात यापूर्वीच या कमांडोंनी धडकी भरवलेली आहे. आता चीनी सैन्यांना या वीर कमांडोचा सामना करावा लागणार आहे.
चीनची आगळीक पाहता आता पूर्व लद्दाखपासून ते सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष ताबा रेषेवर गरुड कमांडोंना तैनात करण्यात आले आहे. गरजर पडल्यास हे कमांडों विशेष मोहिम राबवितील. त्याअतंर्गत शत्रूंची कोणतीही हाणून पाडण्यासाठी ते सज्ज आहेत.
ही विशेष तुकडी यापूर्वीच 2020 मध्ये तैनात करण्यात आली होती. त्यानंतर आता भारतीय वायुसेनेने चीनी सैन्याला पाणी पाजण्यासाठी गरुड कमांडोची कुमक मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता या सैनिकांकडे आहे. हे कोणत्याही वातावरणात टिकून राहण्यासाठी सक्षम आहेत.
गरुड कमांडो सिग सॉअर असॉल्ट रायफल्स, एके-सिरीज असॉल्ट रायफल्स आणि इस्रायली टॅव्हर रायफल्सच्या जोरावार शत्रूंवर भारी पडतील. ही प्रगती शस्त्रे असल्याने दूरवरुनच ते शत्रूला टिपतील. या जवानांकडे स्निपर रायफल तसेच नेगेव लाइट मशीन गन आहेत. त्यामुळे 800-1000 मीटर अंतरावरून शस्त्रू टिपता येतो.