मोठी बातमी! काय सांगता? चीनी लस टोचून घेण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांची नेपाळ वारी, पण कारण काय?
चीनी लस टोचून घेण्यासाठी काही भारतीय व्यापारी नेपाळची राजधानी काठमांडूचा (Indian businessman getting Chinese vaccines) दौरा करत असल्याची माहिती उघड झाली आहे.
मुंबई : चीनी लस टोचून घेण्यासाठी काही भारतीय व्यापारी नेपाळची राजधानी काठमांडूचा (Indian businessman getting Chinese vaccines) दौरा करत असल्याची माहिती उघड झाली आहे. नेपाळ सरकारने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.(Indian businessman getting chinese vaccines in Kathmandu, Nepal travelling from Delhi)
चीनचीच लस का?
दिल्ली तसच इतर ठिकाणचे काही भारतीय व्यापारी काठमांडुला (Kathmandu) जाऊन चीन लसीचा डोस घेत असल्याची माहिती उघड झाली आहे. चीनमध्ये व्यापार किंवा शिक्षण घ्यायचं असेल तर चीनी लसीचा डोस चीनी सरकारनं अनिवार्य केला आहे. काही दिवसांपुर्वीच नेपाळला 8 लाख लसींचा मोफत पुरवठा चीन सरकारनं केला आहे. त्यामुळे काठमांडुत चीनी लस उपलब्ध आहे. ती घेण्यासाठीच भारतीय व्यापारी नेपाळच्या चकरा मारत असल्याचं उघड झालं आहे.
नेपाळ म्हणतो हे शक्यच नाही (Nepal rejects claim) नेपाळ सरकारनं मात्र हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. भारत सरकारला याबद्दल रितसर माहिती दिल्याचही नेपाळ सरकारनं म्हटलं आहे. नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते गणेश श्रीवास्तव म्हणतात, नेपाळमध्ये लस घ्यायची असेल तर ओळखपत्र दाखवणं गरजेचं आहे. ज्यांना लस दिली जात आहे, त्यांची माहिती ठेवली जात आहे, त्यामुळे नेपाळी नागरिकांशिवाय इतर कुणाला लस मिळणं शक्यच नाही.
नेपाळच्या हॉस्पिटल्समध्ये भारतीय व्यापारी IANS ने दिलेल्या माहितीनुसार काठमांडुच्या हॉस्पिटल्समध्ये भारतीय व्यापाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे. विशेष म्हणजे ह्या व्यापाऱ्यांकडे चिनी ओळखपत्रं होतं पण ते हिंदी बोलत होते असाही दावा करण्यात आला आहे.
हे व्यापारी दिल्लीहून काठमांडुला आले आणि लसीचा डोस घेऊन ते परत गेले अशीही माहिती आहे. बुधवारी अशा 30 भारतीय व्यापाऱ्यांनी लस घेतल्याची माहिती आहे. जेव्हापासून चीन सरकारनं चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी चीनी लस अनिवार्य केलीय तेव्हापासूनच भारतीय व्यापारी नेपाळच्या चकरा मारत असल्याची माहिती आहे.
Corona Vaccination : केंद्र सरकारकडून रशियाच्या Sputnik V लसीला मंजुरी, लवकरच लसीकरणाला सुरुवात https://t.co/DBs0WjHSUn @PMOIndia @drharshvardhan @CMOMaharashtra @rajeshtope11 #SputnikV #Sputnik #RussianVaccine #CoronavirusIndia #CoronaVaccine #vaccination
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2021
Indian businessman getting Chinese vaccines in Kathmandu, Nepal travelling from Delhi
संबंधित बातम्या :
Johnson & Johnson Vaccine : भारतात येण्याआधीच अमेरिकेकडून ‘या’ कोरोना लसीवर बंदी, कारण काय?
भारत सरकार ज्या रशियन लसीच्या वापराला मंजुरी देणार आहे ती नेमकी कशी काम करते? वाचा सविस्तर