AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचं ‘डिफेन्स फर्स्ट’: संरक्षण खर्चात जगात तिसरा, 5 लाख कोटींचं बजेट

गेल्या दहा वर्षात देशाचा संरक्षणावरील खर्च 76 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली आहे. वर्ष 2013-14 खर्चाच्या तुलनेत खर्च दुपटीने 5.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

भारताचं ‘डिफेन्स फर्स्ट’: संरक्षण खर्चात जगात तिसरा, 5 लाख कोटींचं बजेट
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 9:46 PM

नवी दिल्ली- राष्ट्रीय संरक्षणावरील खर्चात (Defence Budget) भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाच राष्ट्र ठरलं आहे. अमेरिका व चीन नंतर संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. लोकसभेत प्रश्नोत्तरादरम्यान (Loksabha session) केंद्र सरकारच्या वतीनं माहिती सादर करण्यात आली. गेल्या दहा वर्षात देशाचा संरक्षणावरील खर्च 76 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली आहे. वर्ष 2013-14 खर्चाच्या तुलनेत खर्च दुपटीने 5.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2013-14 साठी संरक्षणावरील खर्च 2.53 लाख कोटी रुपये होता. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (SIPRI) अहवालानुसार संरक्षणावरील खर्चाच्या आधारावर भारत जगात अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

संरक्षण क्षेत्रात निर्यात सज्जता

‘सिपरी’च्या अहवालानुसार, भारताने 2011 ते 2020 दरम्यान संरक्षण खर्चात 76 टक्क्यांनी वाढ केली आहे. ‘सिपरी’च्या अहवालानुसार भारत संरक्षण क्षेत्रात निर्यात सक्षमतेच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्राकडून संरक्षण क्षेत्रातील खर्चाला प्राधान्य दिलं जात असल्याचं राज्यमंत्री भट यांनी उत्तरादरम्यान सांगितलं.

संरक्षण क्षेत्रात स्वदेशीचा नारा

राज्यमंत्री भट यांनी संरक्षण क्षेत्रातील खर्चातील तरतूदीवरुन भाष्य केलं आहे. संरक्षण खर्च विषयक समितीनं जीडीपीच्या विशिष्ट खर्च करण्याची तरतूद केली होती. केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रात स्वदेशीवर अधिक भर देत आहे. देशांतर्गत उत्पादनासाठी निर्धारित एकूण खर्चापैकी 60% खर्च निधी तरतूद केली आहे. केंद्र सरकार प्रसंगी विदेशातून आयात करेल.

अर्थसंकल्प सैन्याचा, निधीचं वर्गीकरण:

अर्थसंकल्पात 2.12 लाख कोटी रुपये संरक्षण सेवांवरील खर्चासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये वेतन, परिवहन, दुरुस्ती, री-फीट, एनसीसी आणि अन्य विभागांचा समावेश आहे. तर लष्कराला 1.48 कोटी, नौदलाला 23 हजार 360 कोटी आणि वायूसेनेला 30 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तर ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाला (OFB) 113 कोटी रुपये राखून ठेवले आहेत.

संरक्षण मंत्रालय ‘फर्स्ट’:

डीआरडीओसाठी 9 हजार कोटी रुपये मिळाले आहे. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने अर्थसंकल्पात 1.35 लाख कोटी रुपये तरतूद केली आङे. मागील वर्षी हा आकडा 1.13 लाख कोटी रुपये होता. या पार्श्वभूमीवर अन्य सर्व मंत्रालयांपेक्षा संरक्षण मंत्रालयासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.