पाकिस्तानच्या तुरुंगातून 20 भारतीय मच्छिमारांची सुटका, उद्या वाघा बॉर्डरवर भारताकडे सोपवणार
चार वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर रविवारी पाकिस्तानच्या लांधी जिल्हा कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. या मच्छिमारांना सोमवारी वाघा सीमेवर (Wagah border) भारताकडे सोपवले जाईल. सुटका करण्यात आलेले बहुतांश मच्छिमार हे गुजरातमधील आहेत.
पाकिस्तानच्या जलक्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याचा आरोपावरून अटक केलेल्या 20 भारतीय मच्छिमारांची (Indian fishermen arrested by Pakistan) पाकिस्तानातून सुटका झाली आहे. चार वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर रविवारी पाकिस्तानच्या लांधी जिल्हा कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. या मच्छिमारांना सोमवारी वाघा सीमेवर (Wagah border) भारताकडे सोपवले जाईल. तुरुंगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. सुटका करण्यात आलेले बहुतांश मच्छिमार हे गुजरातमधील आहेत.
लांधी कारागृहाचे अधीक्षक इर्शाद शाह यांनी सांगितले की, भारतीय अधिकाऱ्यांनी मच्छिमारांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी केल्यानंतर (India identified the fishermen), त्यांना सदिच्छा म्हणून सोडण्यात आले आहे. इर्शाद शाह म्हणाले, या मच्छिमार चार वर्षे तुरुंगात होती आणि आमच्या सरकारने सदिच्छा भावनेनी त्यांची आज सुटका केली आहे.” ईधी ट्रस्ट फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सुटका करण्यात आलेल्या 20 भारतीय मच्छिमारांना लाहोरमधील वाघा बॉर्डरवर नेण्याची सोय केली आहे. सोमवारी त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल.
किती भारतीय पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत?
अधिकाऱ्याने सांगितले की, 588 भारतीय नागरिक अजूनही लांधी तुरुंगात बंद आहेत, त्यापैकी बहुतांश मच्छीमार आहेत. ते म्हणाले की, सिंधच्या गृहविभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही त्यांची सुटका करू. आम्हाला काल फक्त या 20 भारतीय मच्छिमारांना सोडण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तान सागरी सुरक्षा दलाने (पीएमएसएफ) मच्छिमारांना पाकिस्तानी पाण्यात बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याबद्दल अटक केली होती आणि डॉक पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षी 20 भारतीय मच्छिमारांची आणि एप्रिल 2019 मध्ये 100 भारतीय मच्छिमारांना सद्भावना म्हणून सोडली होते. पाकिस्तान आणि भारतातील मच्छिमारांना सहसा एकमेकांच्या पाण्यात बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याबद्दल अटक होते आणि तुरुंगात टाकले जाते. दोन्ही देशांमधील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर स्पष्ट सीमांकन रेषा नसल्यामुळे, मच्छीमार चुकून सीमा ओलांडतात आणि नंतर त्यांना तुरुंगात टाकले जाते.
हे ही वाचा