पाकिस्तानचा पर्दाफाश, आयएसआयचा अधिकारीच हिजबुल दहशतवादी संघटनेचा प्रमुख
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आणि दहशतवादी संघटनांची मिलीभगत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे (Documents show Hizbul chief as ISI officer ).
इस्लामाबाद : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आणि दहशतवादी संघटनांची मिलीभगत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे (Documents show Hizbul chief as ISI officer ). भारतीय गुप्तचर संस्थेंच्या हातात काही पाकिस्ताचे कागदपत्रं लागली आहेत. यात हिजबुल मुजाहिद्दीन (Hizbul Mujahideen) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन (Syed Salahuddin) हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयचा अधिकारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. या कागदपत्रांमुळे त्याला पाकिस्तानमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय कोठेही फिरता येत होतं.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये दिलेल्या वृत्तानुसार, ही कागदपत्रं गुप्तचर विभागाने प्रकाशित केली आहेत. यात म्हटलं आहे, की मोहम्मद युसुफ शाह उर्फ सय्यद सलाहुद्दीन (Syed Salahuddin) आयएसआयचा अधिकारी आहे. त्याच्या वाहनाला सुरक्षा तपासणीसाठी कोठेही जाण्याची गरज नाही. हे पत्र आयसआयचे संचालक वजाहत अली खान यांनी काढलं होतं. याची वैधता डिसेंबर 2020 पर्यंत आहे.
हिजबुलचा भारतात विस्तारासाठी प्रयत्न
हे पत्र अशावेळी समोर आलं आहे जेव्हा हिजबुल मुजाहिद्दीन भारतात आपली पाळंमुळं पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्याने शनिवारी प्रेस कॉन्फरन्समध्ये याबाबत माहिती दिली होती. उत्तर काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटना सक्रीय झालेली दिसत आहे. या भागात हिजबुल आपला बेस तयार करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करत असल्याचं यावरुन दिसत आहे, अशी माहिती सैन्याने दिली आहे.
भारतीय गुप्तचर संस्थांनी हा मोठा पुरावा असल्याचं सांगितलं आहे. यामुळे आयएसआयचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे. आयएसआय दहशतवादी संघटनांसोबत मिळूनच भारतात घातपात करत असल्याचाही आरोप यामुळे होत आहे. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी या संघटनांना आयएसआयकडून निधी मिळतो. सलाहुद्दीन हिजबुलसोबतच यूनाटेड जिहाद काउंसिलचाही (UJC) प्रमुख आहे. ही लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संघटना आहे.
संबंधित बातम्या :
“जुबी, न घाबरता सरेंडर कर बेटा” आईची विनवणी जुमानली नाही, तिघा दहशतवाद्यांना अखेर कंठस्नान
ईंट का जवाब पत्थर से, काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा
आयसीसशी संबंधाच्या संशयातून दोघांना अटक, पुण्यात एनआयएची कारवाई
Documents show Hizbul chief as ISI officer