भारतीय रेल्वेचा पहिला केबल ब्रिज जम्मू-काश्मीरमधील ऊधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक विभागात उभारला जात आहे. ‘अंजी ब्रिज’ असे या पुलाचे नाव असून, याची लांबी 473.25 मीटर आहे.
अंजी पुलाच्या खांबाची उंची नदीच्या तळापासून 331 मीटर आहे.
हा पुल जम्मू-काश्मीरमधील कटरा आणि रियासीला यांना जोडणार आहे. ऊधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला दरम्यानचा हा रेल लिंक 292 किमी लांबीचा आहे.
या पुलाला भक्कम आधार देण्यासाठी 96 केबल्सचे जाळे तयार केले जाणार आहे. हे विशेष डिझाईन तीव्र वाऱ्याच्या माऱ्यात आणि तीव्र वादळातही पुलाला भक्कमपाने उभे राहण्यास मदत करेल.
हा पूल ऊधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला यांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाचा एक भाग आहे. या पुलाच्या माध्यमातून कटारा ते श्रीनगरपर्यंत थेट रेल्वे गाड्या चालवण्यात येतील.
अंजी पूल हा पूर्णपणे केबलच्या जाळ्यावर टिकून राहणार आहे. हा पूल कुतुब मीनारपेक्षा सुमारे 4 पट उंच आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.