Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Reservation Cancelled | 30 जूनपर्यंत आरक्षित सर्व रेल्वे तिकिटे रद्द, विशेष ट्रेन्स मात्र सुरु राहणार

रेल्वेने आधी 17 मेपर्यंत ट्रेनची तिकिटे रद्द केली होती. आता ही मुदत वाढवून 30 जूनपर्यंतची आरक्षित तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Indian Railways cancels tickets booked till 30th June)

Railway Reservation Cancelled | 30 जूनपर्यंत आरक्षित सर्व रेल्वे तिकिटे रद्द, विशेष ट्रेन्स मात्र सुरु राहणार
आता मोदी सरकार छोट्या व्यावसायिकांना भारतीय रेल्वेसोबत (Indian Railway) काम करून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी देत आहे.
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 1:07 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने 30 जून 2020 पर्यंत आरक्षित झालेली सर्व तिकिटे रद्द केली आहेत. जून अखेरपर्यंत बूक केलेल्या सर्व तिकिटांची रक्कम प्रवाशांना रिफंड केली जाणार आहे. मात्र या कालावधीत सर्व विशेष ट्रेन्स आणि श्रमिक स्पेशल एक्सप्रेस आधीप्रमाणेच सुरु राहणार आहेत, त्यांची तिकिटे रद्द केली नाहीत. (Indian Railways cancels tickets booked till 30th June)

रेल्वेने आधी 17 मेपर्यंत ट्रेनची तिकिटे रद्द केली होती. आता ही मुदत वाढवून 30 जूनपर्यंतची आरक्षित तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाने रद्द केलेल्या तिकिटांच्या रिफंडविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 21 मार्चनंतर आरक्षित झालेल्या रेल्वेच्या तिकिटांचा यामध्ये समावेश आहे.

(Indian Railways cancels tickets booked till 30th June)

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 25 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. केवळ मालगाडीने जीवनावश्यक वस्तूंची ने-आण सुरु आहे.

12 मेपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. देशभरातील 15 रेल्वे स्टेशनदरम्यान 15 गाड्या (30 फेऱ्या) सुरु झाल्या. या विशेष रेल्वे नवी दिल्लीपासून दिब्रुगड, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या 15 रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवासी वाहतूक करतील. त्यामुळे देशभरात अडकून पडलेल्या प्रवाशांना या ठिकाणांहून आपल्या गावाच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.

ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असणार आहे त्यांनाच रेल्वे स्टेशनवर प्रवेश दिला जाणार आहे. प्रवाशांना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच रेल्वे प्रवासाला सुरुवात होण्याआधी प्रत्येक प्रवाशाची तपासणी देखील होणार आहे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाला परवानगी मिळणार आहे. (Indian Railways cancels tickets booked till 30th June)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.