Tripura Voilence: ट्विट केलं म्हणून पत्रकारावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केल्याबद्दल इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्सचा निषेद

त्रिपुरा पोलिसांनी 100 जणांसह पत्रकार श्याम मीरा सिंग यांच्यावर UAPA अंतर्गत जणांसह गुन्हा दाखल केला हे धक्कादाक आणि निराशादायक आहे. श्याम मीरा सिंह यांनी 'Tripura is burning' (त्रिपुरा जळत आहे) असं ट्विट केल्याचा आरोप आहे.

Tripura Voilence: ट्विट केलं म्हणून पत्रकारावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केल्याबद्दल इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्सचा निषेद
Students Federation in Delhi protests against UAPA in Tripura voilence
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 9:13 PM

नवी दिल्ली: इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स (IWPC) ने एक पत्रकार आणि इतर सुमारे शंभर लोकांवर दहशदवाद प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत त्रिपुरा पोलिसांनी (Tripura police) गुन्हा दाखल केल्याबद्दल रोष व्यक्त केला आहे आणि विलंब न करता आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे. “त्रिपुरा पोलिसांनी 100 जणांसह पत्रकार श्याम मीरा सिंग यांच्यावर UAPA अंतर्गत जणांसह गुन्हा दाखल केला हे धक्कादाक आणि निराशादायक आहे. श्याम मीरा सिंह यांनी ‘Tripura is burning’ (त्रिपुरा जळत आहे) असं ट्विट केल्याचा आरोप आहे. घटनेचे खरी माहिती देणे, ठळकपणे मांडणे हे पत्रकाराचे काम आहे. सत्तेत असलेल्या लोकांना खूश करणे हे पत्रकाराचे काम नाही, असं IWPC म्हटले आहे. (Indian Women Press Corp and Editors Guild of India condemn against Tripura Police UAPA action against a journalist in Tripura Voilence)

पत्रकारावर एका ट्विटसाठी UAPA लागू केला

श्याम मीरा सिंह यांच्यावरील UAPA चा आरोप हा कायद्याचा गैरवापर करून पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. काही विलंब न करता आरोप मागे द्यावा आणि पत्रकारांना त्यांचे काम मुक्तपणे करू द्या, असं IWPC म्हटले. रविवारी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने (EGI) पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला होता. पत्रकारावर फक्त एका ट्विटसाठी UAPA लागू केला गेला. हे अत्यंत वाईट आहे की केवळ जातीय हिंसाचाराची बातमी दिली म्हणून असा कठोर कायदा लागू केला जातो, जिथे तपास प्रक्रियेत आणि जामीन अर्ज अत्यंत कठोर आहे, असं एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने म्हटल.

त्रिपुरा पोलिसांनी 102 ट्विटर अकाउंट्स (Twitter Accounts) विरोधात UAPA लागू केला आहे. गेल्या महिन्यात उत्तर त्रिपुरामध्ये पानसागर हिंसाचाराशी संबंधित बनावट आणि विकृत माहिती पसरवल्याचा आरोह यांचावर आहे.

एकाही मशिदीला आग लागल्याची घटना नाही ?

यापूर्वी त्रिपुरा उत्तर रेंजचे डीआयजी म्हणाले होते की, सोशल मीडियावर अतिशयोक्तीपूर्ण आणि विकृत अफवा पसरवल्या जात होत्या, ज्यामुळे दोन धार्मिक समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. त्रिपुराचे महानिरीक्षक (IG) कायदा आणि सुव्यवस्था प्रभारी सौरभ त्रिपाठी यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, त्रिपुराच्या पानीसागरमध्ये हिंसा दर्शवणारे नकली फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत. ते म्हणाले की हे काही “देशविरोधी” घटक पसरवत आहेत. त्रिपुरातील एकाही मशिदीला आग लागल्याची घटना घडली नसल्याचे ते म्हणाले.

Other News

MP Sex Racket: शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 मुलींसह 3 ग्राहकांना अटक

देशातील टॉप 10 प्रदूषित शहरांमध्ये यूपीतील आठ शहरांचा समावेश, वृंदावनमध्ये सर्वाधिक प्रदूषण

India vs Namibia Toss result: अखेरच्या सामन्यात विराटने जिंकला टॉस, एका बदलासह भारतीय संघ मैदानात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.