Anju Pakistan | पाकिस्तानात गेलेल्या अंजूला धोका? निकाहची चर्चा, नसरुल्लाह म्हणाला, ‘मी अंजूवर….’
Anju Pakistan | दोन मुलांची आई अंजू प्रियकरासाठी भारत सोडून पाकिस्तानात गेलीय. अंजूला पाकिस्तानात पोलीस संरक्षण मिळालय. अंजूला 50 पोलिसांच संरक्षण मिळालय.
लाहोर : सीमा हैदरनंतर आता सोशल मीडियावर अंजूची चर्चा आहे. राजस्थानची अंजू प्रियकरासाठी भारत सोडून पाकिस्तानात गेली. अंजूच्या प्रेम कथेत आता नवीन चॅप्टर जोडला गेलाय. अंजूने खैबर पख्तूनख्वाच्या अपर दीर जिल्ह्यात राहणाऱ्या नसरुल्लाह सोबत निकाह केल्याचा पाकिस्तानी माध्यमांनी दावा केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंजूने निकाह करण्याआधी धर्म परिवर्तन केलं. आपलं नाव बदलून फातिमा केलं.
ही बातमी बाहेर आल्यानंतर आता निकाहवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय. काहींनी हे कारस्थान असल्याच म्हटलं आहे, तर काही अंजूची फसवणूक झाली असं म्हणतायत.
अंजूला पाकिस्तानी पोलिसांची सुरक्षा
“अंजूच्या बाबतीत कुठलही कारस्थान नाहीय. तिच्यावर कुठलीही जबरदस्ती झालेली नाही” असं नसरुल्लाह टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं. “मीडियामध्ये सुरु असलेल्या सर्व बातम्या अफवा आहेत. कोर्टात आमच लग्न झालेलं नाही. आम्ही सुरक्षा मागण्यासाठी कोर्टात गेलो होतो. अंजू परदेशातून आलीय. तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कोर्टाकडून 50 पोलिसांची सुरक्षा मिळाली आहे. पाकिस्तानात रिवाज़ आहे, त्यामुळे अंजूने बुर्खा परिधान केला. अंजूला बुर्खा घालायला आवडतं” असं नसरुल्लाहने सांगितलं.
‘मी तिच्याशी निकाह करायला तयार, पण….’
“भारतातील न्यायालयात अंजूच्या घटस्फोटाच प्रकरण सुरु आहे. माझं अंजूवर प्रेम नाही, अंजू सुद्धा माझ्यावर प्रेम करत नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. तिची इच्छा असेल, तर मी तिच्याशी निकाह करायला तयार आहे” असं नसरुल्लाहने टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं. निकाहआधीच हे प्री वेडिंग फोटोशूट
पाकिस्तानातून अंजू आणि नसरुल्लाहचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. यात दोघे परस्परासोबत खूप रोमँटिक दिसतायत. निकाहआधीच हे प्री वेडिंग फोटोशूट असल्याच बोललं जातय. व्हिडिओ ड्रोनने शूट करण्यात आलाय. अंजू नसरुल्लाह सोबत फोटो काढतेय. दोघे रील्स सुद्धा बनवतायत.