देव डॉक्टर आणि देवदुत इंडिगोचे पायलट; अवघ्या 150 मिनिटांत पोहचवले हृदय, गुजरातच्या वडोदरातून मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटल्समध्ये झाला ह्रदयाचा प्रवास

मुंबईत एका रूग्णावर हृदय प्रत्यारोपण करण्यात येणार होते. मात्र ते होते गुजरातमधील वडोदरा येथे आणि ते ह्रदय बंद पडण्याआधी प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. अशा वेळी एका जीवासाठी कोणतेही तडजोड न करता इंडिगोच्या वैमानिकांनी आपले विमान आकाशात झेपवले आणि 150 मिनिटांत मुंबईत उतरवले.

देव डॉक्टर आणि देवदुत इंडिगोचे पायलट; अवघ्या 150 मिनिटांत पोहचवले हृदय, गुजरातच्या वडोदरातून मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटल्समध्ये झाला ह्रदयाचा प्रवास
इंडिगो Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 11:01 PM

नवी दिल्ली : देव ज्याच्या पाठिशी असतो त्याच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. याचा अर्थ असा की ज्याच्याजवळ देव आहे त्याला कोणीही नुकसान करू शकत नाही. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. जिथे जीवन-मरणाच्या खाईत लोटणाऱ्या एका व्यक्तीला डॉक्टरांनी धडधडणारे हृदय (Heart) दिल्याने त्याला नवसंजीवनी मिळाली. यासाठी इंडिगो कंपनीने (Indigo Company) आपल्या विमानांला गरूडाचे पंखच लावले. ज्यामुळे गुजरातमधील वडोदरा येथून देशाची आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी अवघ्या 150 मिनिटांचा अवधी लागला. यानंतर डॉक्टरांनी वेळेत रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रीया करत ते हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant) केले.

एखाद्याकडे काहीच क्षण असताना त्याचे प्रिय त्याच्यासाठी देवाकडे धाव घेतात आणि टाहो फोडून त्याला परत कर अशी देवाला हाक मारतात. त्यावेळी देव ही त्यांची करून हाक ऐकतो आणि त्याला परत करतो. हे एका चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटतं आहे… का? ही कथा नक्कीच एका चित्रपटातील कथानकातील आहे. मात्र येथे देव आहेत डॉक्टर आणि देवदुत आहे इंडिगो कंपनीचे पायलट. आपल्याकडे हिंदी चित्रपटांत एक डॉयलॉग सदा ऐकायला मिळतो, तो म्हणजे जाको राखे साइयां, मार सके न कोय’ याचा अर्थ ज्याच्यासोबत देव आहे त्याचे कोणीही बिघडवू शकत नाही. या सुप्रसिद्ध म्हणीप्रमाणेच देवदुत आहे इंडिगो कंपनीचे पायलट धावून आले. आणि त्यांनी एका रूग्णाला हृदय फक्त 150 मिनिटांत पोच केले. तर हृदय मिळताच देव मानले जाणाऱ्या डॉक्टरांनीही वेळन घालवता ते हृदय प्रत्यारोपण केले आणि त्या रूग्णाचे जीव वाचवले.

150 मिनिटांत मुंबईत

मुंबईत एका रूग्णावर हृदय प्रत्यारोपण करण्यात येणार होते. मात्र ते होते गुजरातमधील वडोदरा येथे आणि ते ह्रदय बंद पडण्याआधी प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. अशा वेळी एका जीवासाठी कोणतेही तडजोड न करता इंडिगोच्या वैमानिकांनी आपले विमान आकाशात झेपवले आणि 150 मिनिटांत मुंबईत उतरवले. त्यांच्या या कार्यामुळे हृदय मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये सुरक्षितपणे पोहोचवले. ग्लोबल हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांच्या टीमने एका व्यक्तीला नवीन जीवन दिले. हे धडधडणारे हृदय तीन तासांत ऑपरेशन थिएटरमध्ये नेणे गरजेचे होते, असे बोलले जात आहे. त्यानंतर आता वाहतूक कर्मचारी, इंडिगोचे अधिकारी आणि डॉक्टरांच्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे प्रकरण 7 जूनचे आहे.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक जीव अनमोल आहे

हे मिशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, इंडिगोचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, त्यांची विमान कंपनी जीव वाचवण्याच्या या प्रयत्नाचे कौतुक करते. प्रत्येक जीव मौल्यवान आहे. वडोदरा आणि मुंबईतील आमच्या विमानतळावरील वैमानिक आणि कर्मचारी यांच्या यशस्वी प्रयत्नांसाठी मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो.

इंडिगोच्या सुरक्षा व्यवस्थापकांचे – ग्लोबल हॉस्पिटल्सचे अभिनंदन

ग्लोबल हॉस्पिटल्सनेही इंडिगो टीमचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले आहे. ग्लोबल हॉस्पिटल्सने एक निवेदन जारी केले आहे की, “आम्ही मुंबई विमानतळावरील इंडिगोचे सुरक्षा व्यवस्थापक मनोज दळवी आणि अहमदाबाद विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थापक रामचंद्र द्विवेदी यांचे आभार मानू इच्छितो की, प्रत्यारोपणाच्या टीमला सर्व संभाव्य आंतरशहर बदल्यांमध्ये समन्वय आणि मदत केल्याबद्दल.” त्यांचे योगदान दिले. गेल्या महिन्यात इंडिगोने पुण्याहून हैदराबादला फुफ्फुसांच्या वाहतुकीतही यशस्वीपणे मदत केली होती.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...