सासऱ्यांपाठोपाठ पतीचाही कोरोनाने मृत्यू, चीनहून पत्नीचा व्हिडीओ कॉलमधून अखेरचा निरोप

इंदौरमध्ये राहणाऱ्या मनोज शर्मा यांचा कोरोनावरील उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. (Indore Engineer Corona Wife Video Call)

सासऱ्यांपाठोपाठ पतीचाही कोरोनाने मृत्यू, चीनहून पत्नीचा व्हिडीओ कॉलमधून अखेरचा निरोप
मनोज शर्मा पत्नी आणि मुलासह
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 11:29 AM

भोपाळ : कोरोनाशी दोन हात करताना इंदौरमधील इंजिनिअरला प्राण गमवावे लागले. तर पत्नी चीनमध्ये असल्यामुळे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पतीच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याची वेळ तिच्यावर आली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इंजिनिअर मनोज शर्मा यांच्या वडिलांचेही काही दिवसांपूर्वी कोरोनानेच निधन झाले होते. (Indore Engineer Manoj Sharma Dies of Corona Wife last rites on Video Call from China)

मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये राहणाऱ्या मनोज शर्मा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले शर्मा बारा दिवस कोरोनाशी झुंज देत होते. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारत दौऱ्यावेळीच वडिलांचेही निधन

शर्मा चीनमधील शेनझेन बँकेत नोकरी करत होते. तीन महिन्यांपूर्वी मनोज सहकुटुंब इंदौरमधील सिवनी बालाघाट भागातील घरी आले होते. दरम्यानच्या काळातच त्यांच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतर आपल्या आईची काळजी घेण्यासाठी ते मायदेशीच थांबले. तर पत्नी आणि मुलाला त्यांनी चीनला परत पाठवले.

काही दिवसांपूर्वी मनोजही कोरोनाच्या विळख्यात सापडले. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना इंदौरमधील अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र बारा दिवसांनंतर ते जीवनाशी लढाई हरले.

पत्नी-मुलगा चीनमध्येच

चीनमध्ये असलेल्या मनोज शर्मा यांच्या पत्नीला पतीनिधनाची दुःखद बातमी सांगितली गेली. इथे आईवर दुःखाचा डोंगर कोसळला, तर तिथे पत्नीवरही मोठा आघात झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्यांचे पार्थिव चीनला पाठवणे शक्य नव्हते, तर त्यांनाही भारतात येण्यात अडथळे होते.

व्हिडीओ कॉलमधून पतीला अखेरचा निरोप

अखेर, मनोज यांच्या एका मित्राशी त्यांनी संपर्क साधला. मित्राने इंदौरमधील एका समाजसेवी संस्थेची मदत घेतली. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने मनोज शर्मा यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. समाजसेवकाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी हजारो किलोमीटर दूरवर बसलेल्या त्यांच्या पत्नीने व्हिडीओ कॉलमधून पतीला अखेरचा निरोप दिला.

संबंधित बातम्या :

‘कोरोना’शी लढणाऱ्या ‘देवदुता’चं कर्तव्याला प्राधान्य, आईला ‘व्हिडीओ कॉल’मधून अखेरचा निरोप

दिवाळीत आई-बहिणींकडून ऑनलाईन औक्षण, नाशिकचे शहीद जवान नितीन भालेरावांचा डोळे पाणावणारा व्हिडीओ

(Indore Engineer Manoj Sharma Dies of Corona Wife last rites on Video Call from China)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.