Sheena Bora Murder Case : इंद्राणी मुखर्जीची आजची रात्र ही तुरंगातच; 6 वर्षानंतर येणार होती बाहेर
तर आज फक्त मुंबई सत्र न्यायालयाची कायदेशीर बाबी पार पडली. ज्यामुळे इंद्रायणीचा आजच्या रात्रीचा मुक्काम तुरूंगातच असणार आहे. तर यावेळी जी न्यायालयाने रक्कम सांगितली आहे ती उद्या सकाळी भरू, त्यानंतर इंद्रायणी यांची जामिनावर भायखळा तुरूंगातून मुक्तता होईल असे इंद्राणी मुखर्जी हिचे वकिल एड सना खान यांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली : आपल्या पोटच्या मुलीच्या हत्येप्रकरणी जेलमध्ये असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukharjee) कोर्टाने दिलासा देताना तिचा जामीन मंजूर केला. इंद्राणी मुखर्जीवर मुलगी शीना बोरा (Sheena bora)हिच्या हत्या अरोप होता. त्याप्रकरणी ती गेल्या सहा वर्षांपासून मुंबईच्या भायखळा महीला तरुंगात शिक्षा भोगत होती. तर तिला काल 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. याच्याआधीही मुंबई हायकोर्ट आणि सत्र न्यायालयांनी वेगवेगळ्या 7 जामिनांचे अर्ज फेटाकून लावले होते. जेलमध्ये असतानाच, इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी याच्यापासूनही तिचा घटस्फोट झाला आहे. वैद्यकीय कारणंमुळे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अखेर मंजूर केला आहे. पीटर मुखर्जी यांना लावण्यात आलेल्या अटी या इंद्राणी यांनाही लागू असतील, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. इंद्राणींचे आधीचे पती पीटर मुखर्जी हेही या प्रकरणातील आरोपी आहेत. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केल्यामुळे, पाच महिन्यांपूर्वी या प्रकरणाला वेगळे वळण आले होते. तुरुंगात असलेल्या एका महिला कैद्याची काश्मीरमध्ये शीनाशी भेट झाली होती, असा खळबळजनक दावा इंद्राणीने केला होता.
Supreme Court grants bail to Indrani Mukherjea, prime accused in Sheena Bora murder case.
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 18, 2022
गुन्ह्यात कुठलिही प्रगती नाही
शीना बोरा हत्या प्रकरणी गेल्या6 वर्षाहून अधिक काळ इंद्राणी मुखर्जी तुरुंगात होत्या. दरम्यानच्या काळात या प्रकरणाच्या तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. तसेच याप्रकरणी तिचा घटस्फोटीत पती पीटर मुखर्जी हा देखील जामिनावर बाहेर आहे. तर तुरूंगात इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती खालावली होती. तर इंद्रायणी विविध आजारांनी त्रस्त होत्या. तिला उपचाराची ही गरज असलायचे कारण सांगत तिने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. याच आधारावर सुप्रीम कोर्टाने साक्षीदारांना भेटू नये व 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
उद्या सकाळी पैसे भरणार
तर आज फक्त मुंबई सत्र न्यायालयाची कायदेशीर बाबी पार पडली. ज्यामुळे इंद्रायणीचा आजच्या रात्रीचा मुक्काम तुरूंगातच असणार आहे. तर यावेळी जी न्यायालयाने रक्कम सांगितली आहे ती उद्या सकाळी भरू, त्यानंतर इंद्रायणी यांची जामिनावर भायखळा तुरूंगातून मुक्तता होईल असे इंद्राणी मुखर्जी हिचे वकिल एड सना खान यांनी सांगितलं आहे.
मुलगी शीना जिवंत असल्याचा दावा
शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केल्यामुळे, पाच महिन्यांपूर्वी या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. तुरुंगात असलेल्या एका महिला कैद्याची काश्मीरमध्ये शीनाशी भेट झाली होती, असा खळबळजनक दावा इंद्राणीने केला होता. इंद्राणीने या प्रकरणात सीबीआय संचालकांना पत्र पाठवले होते. त्यांनी शीना बोरा हिचा तपास काश्मिरात करावा, असे अपीलही केले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. शीना हिचा गळादाबून हत्या केल्याचा आणि नंतर तिचा मृतदेह जमिनीत गाडल्याचा इंद्राणीवर आरोप आहे.
सीबीआय हे प्रकरण बंद करणार होती
शीना बोरा प्रकरणाचा तपास बंद करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता. मुंबईच्या स्पेशल कोर्टात सीबीआयने सांगितले होते की, 2012 सालच्या या प्रकरणातील त्यांचा तपास पूर्ण झाला आहे. सीबीआयने या प्रकरणात तीन आरोपपत्रं आणि दोन पुरवणी आरोपपत्रं दाखल केली होती. यात इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, जुना पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांना आरोपी करण्यात आले होते.