एका- एका जवानाला तिघांनी घेरले, तरीही भारतीय वीर भिडले, गलवान खोऱ्यातील थराराची इनसाईड स्टोरी

चीनच्या सैन्याने एका षडयंत्रांतर्गत भारतीय सैनिकांवर फसव्या पद्धतीने कसा हल्ला केला ते जाणून घेऊ. (Inside story Galwan Valley Indo China Face off)

एका- एका जवानाला तिघांनी घेरले, तरीही भारतीय वीर भिडले, गलवान खोऱ्यातील थराराची इनसाईड स्टोरी
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 12:49 PM

नवी दिल्ली : खोटारड्या चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. लडाखमध्ये सैन्य माघारीदरम्यान चीनने विश्वासघात करुन भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. गोळीबार करण्यास बंधनं असल्याने दगड-धोंडे आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवून, चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. यामध्ये 20 जवानांना वीरमरण आलं तर काही जवान जखमी आहेत. (Inside story Galwan Valley Indo China Face off)

दुसरीकडे भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिलं. भारताच्या प्रत्युत्तरात चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार झाला. तर जखमी किंवा मृत जवानांची संख्या 43 इतकी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.

चीनच्या सैन्याने एका षडयंत्रांतर्गत भारतीय सैनिकांवर फसव्या पद्धतीने कसा हल्ला केला ते जाणून घेऊ. (Inside story Galwan Valley Indo China Face off)

वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपले सैन्य मागे घेण्याचं ठरलं. त्यानुसार 15 जूनपासून याबाबत पावलं उचलणं आवश्यक होतं. ठरल्यानुसार चिनी सैन्य गलवान प्रदेशातून आपल्या हद्दीत परत जाणं अपेक्षित होतं. तर 16 जून रोजी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी चिनी सैन्य माघार घेईल यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली होती.

खोटारडे चिनी

मात्र सैन्य माघारीचं ठरलं असूनही, जेव्हा चिनी सैन्याने जाणून बुजून मागे हटण्याबाबत कोणतीही पावलं टाकली नाहीत. त्यावेळी 16 बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वात भारतीय सैन्याची छोटी तुकडी चिनी सैन्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. या चर्चेवेळी चीन मागे हटण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून त्यांची मन:स्थिती नसल्याचं दिसलं.

अशी माहिती आहे की, कर्नल संतोष बाबू चिनी सैन्यांसोबत चर्चा करत असताना, चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना वेढले आणि लाठी, दगड आणि काटेरी तारांनी त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या चकमकीदरम्यान एका भारतीय जवानाच्या तुलनेत चीनचे 3-3 सैनिक होते. पण अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी हा हल्ला केवळ परतवूनच लावला नाही तर चिनी सैनिकांना तोडीस तोड उत्तर दिलं.

3 तास संघर्ष, भारताची दुसरी कुमक तातडीने हजर

सुमारे 3 तास दोन्ही बाजूने संघर्ष झाला. या झटापट आणि धक्काबुक्कीत कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांना गंभीर दुखापत झाली. हा संघर्ष सुरु झाल्यानंतर काही वेळाने भारतीय सैनिकांची दुसरी टीम घटनास्थळी पोहोचली. भारतीय जवानांनी मग खोटारड्या चिनी सैनिकांना पळताभुई थोडी केली. भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचं मोठं हाल केल्याचं वृत्त एएनआयने दिलं.

एएनआयच्या वृत्तानुसार या हिंसक चकमकीत 43 चिनी सैनिकांचा मृत्यू किंवा जखमी झाले आहेत. तथापि चीनने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.

दरम्यान या प्रकारानंतर दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी CDS बिपीन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांशी बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील उपस्थित होते.

या बैठकीनंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानीही उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. लडाखमधील परिस्थिती पाहता सेनाप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी पठाणकोट दौरा रद्द केला होता.

(Inside story Galwan Valley Indo China Face off)

संबंधित बातम्या  

LAC Face-off Live Updates : चीनच्या कमांडिंग ऑफिसरसह 40 चिनी सैनिक ठार : ANI

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.