Court : शेवटी प्रेमावरील डाग पुसला..सहमतीने लग्न केल्याचे झाले सिद्ध, 27 वर्षानंतर दोन भिन्न धर्मियांच्या लढ्याला यश..

Court : ' प्रेम कर भिल्लासारखं..'प्रेमासाठी वाटेल ते करणारे फार कमी लोक असतात.

Court : शेवटी प्रेमावरील डाग पुसला..सहमतीने लग्न केल्याचे झाले सिद्ध, 27 वर्षानंतर दोन भिन्न धर्मियांच्या लढ्याला यश..
फेसटाईमबाबत मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 4:52 PM

भोपाळ : प्रेम (Love) कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं, असंच एका ज्वालाग्नी मनात घेऊन प्रेमवीरांनी (Lovers) त्यांच्या प्रेमावरील डाग पुसला. त्यासाठी त्यांनी थोडी-थोडीकी नव्हे तर तब्बल 27 वर्षे न्यायालयीन लढा (Court) दिला..काय आहे ही प्रेमकथा, वाचुयात..

मध्यप्रदेशातील पन्नी जिल्ह्यातील नायाब खान याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 27 वर्षानंतर त्यांनी मोकळा श्वास घेतला. त्यांना प्रेम तर मिळाले. पण त्यांच्यावरचा एक डाग पुसण्यासाठी त्यांना जवळपास तीन दशकांचा लढा द्यावा लागला.

27 वर्षांपूर्वी त्यांच्यावर एका हिंदू मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार नायाब खान सध्या 50 वर्षांचे आहेत. तक्रारीनंतर त्यांना जुलै 1995 मध्ये अटक करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

प्रकरणात 1998 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना फूस लावून पळविल्याप्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. पण त्यांची पत्नी मेधा गौतम यांनी नायाब याच्यासोबत पळून गेल्याचे मान्य केले होते.

मेधा यांनी नायाब यांच्यासोबत सहमतीने लग्न केल्याचेही मान्य केले होते. लग्नावेळी मेधा या 18 वर्षाच्या तर नायाब हा 23 वर्षाचा होता. ते दोघेही उत्तर प्रदेशात पळून गेले होते.त्यांनी जुलै 1995 साली लग्न केले होते.

मेधा यांच्या वडिलांनी मेधा या केवळ 16 वर्षांच्या असल्याचा शाळेचा दाखल दिला होता. खानने आपल्या मुलीला जबरदस्तीने पळवून नेल्याचा ठपका मेधा यांच्या वडिलांनी ठेवला होता. त्याआधारे खानला शिक्षा सुनावण्यात आली होती.

अपहरण प्रकरणात खानला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. एका महिन्यानंतर जामीनावर त्यांची सूटका झाली. तेव्हापासून ते दोघेही सोबत राहतात. पण आपण पळून गेलो नाही आणि आपण मेधाला पळवून नेले नाही, ही बाब सिद्ध करण्यासाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली.

सहमतीने लग्न केले हे सिद्ध करण्यासाठी या दोघांनीही लढा दिला. खानने हायकोर्टात धाव घेतली. दोघांनी त्यांच्यावर झालेले खोटे आरोप पुसून टाकण्यासाठी हा लढा दिला आणि तो 27 वर्षांनी जिंकला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.