International Women’s Day : निता अंबानींचे महिलांसाठी खास ‘Her Circle’, कसं करणार काम?

दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. (Nita Ambani launched Her Circle)

International Women's Day : निता अंबानींचे महिलांसाठी खास ‘Her Circle’, कसं करणार काम?
निता अंबानी
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 10:40 PM

मुंबई : दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी महिलांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. Her Circle हे एक प्रेरणादायक आणि सर्वसमावेशक, सोशल मीडियावरील डिजीटल प्लॅटफॉर्म आहे. या डिजीटल प्लॅटफॉर्मचा उद्देश महिलांना सक्षम बनवणे, त्यांच्यातील सुसंवाद वाढवणे हा आहे. (Nita Ambani launched Her Circle)

Her Circle ही एक वेबसाईट आणि अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि माय जिओ अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप पूर्णपणे फ्री आहे. सध्या हे अ‍ॅप इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्यानंतर त्यात इतर अनेक भाषा लाँच केल्या जाणार आहेत.

“जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवर अवलंबून असते, तेव्हा अविश्वसनीय गोष्टी घडतात. रिलायन्स फाऊंडेशनच्या स्त्रिया असो किंवा मी काम केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला नेत्या. त्यांच्या सर्वांच्या अनुभवावरुन एक गोष्ट दिसते ती म्हणजे आपले संघर्ष आणि विजय एकमेकांशी एकत्र होतात. Her Circle द्वारे महिलांचे कलागुण आणि त्यांच्या उपक्रमांचे स्वागत करेल,” अशी प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिली.

Her Circle नेमकं काय?

Her Circle हे एक महिलांचा एक विशेष समूह असेल. याद्वारे महिलांचे एक विशिष्ट ध्येय साध्य केले जाईल. तसेच महिलांच्या आकांक्षा, महत्वाकांक्षा, सर्व सामाजिक पार्श्वभूमी, महिलांची स्वप्ने आणि क्षमता पूर्ण करेल.  (Nita Ambani launched Her Circle)

असे करेल काम?

Her Circle हे महिलांशी निगडीत एक वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. यात महिलांसाठी विविध प्रकारची माहिती असेल. तसेच व्हिडीओ असतील. त्याशिवाय राहणीमान, स्वास्थ्य, आर्थिक, काम, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिटी सर्विस, ब्यूटी, फॅशन, इंटरटेनमेट इत्यादी इतर गोष्टींच्या संबंधित लेख असतील. यात महिलांना आरोग्य, निरोगीपणा, शिक्षण, वित्त, मार्गदर्शक, उद्योजकता इत्यादी तज्ञांकडून माहिती मिळेल.

तसेच महिलांना नवीन व्यावसायिक कौशल्ये शिकण्यास आणि त्यांच्या प्रोफाइलनुसार नोकरी मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपद्वारे तुम्ही कॉम्प्लिमेंटरी डिजीटल कोर्सही करु शकता. यात अनेक महिला त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी घटना शेअर करतील.

यातील सोशल नेटवर्किंग भाग हा केवळ महिलांसाठी मर्यादित असेल. तर व्हिडीओ आणि इतर लेख हे कोणीही वाचू शकते. तसेच एखाद्या वैद्यकीय आणि आर्थिक सल्ल्यांसाठी गोपनीय चॅटरूमही असणार आहे. यात एक अ‍ॅप ट्रकरही असणार आहे. त्याद्वारे तुम्हाला फिटनेस, फायनान्स आणि मासिक पाळी ट्रॅक करता येणार आहे. (Nita Ambani launched Her Circle)

संबंधित बातम्या : 

इंटरनेटवरून शिका फक्त 5 गोष्टी; मग बघा कसे कमवाल पैसे

Gold Rate Today: 8 महिन्यांत सोने-चांदी 13,000 रुपयांनी स्वस्त; झटपट वाचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव; वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.