राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण मिळाले का? विश्व हिंदू परिषदेने दिले उत्तर

ram mandir pran pratishtha | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. यावरुन राज्यातील राजकारण तापले होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण दिले नसल्यावरुन संजय राऊत संतापले होते. आता यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण मिळाले का? विश्व हिंदू परिषदेने दिले उत्तर
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 9:57 AM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली, दि.29 डिसेंबर | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. परंतु या सोहळ्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण पाठवले नसल्याचे आरोप होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अयोद्धेत राम मंदिरासाठी निमंत्रण पाठवणारे भाजप कोण? आम्ही भाजपचे हे पॉलिटीकल इव्हेंट संपल्यानंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेऊ, असे म्हटले. त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित दिले आहे.

कोणाला पाठवले निमंत्रण

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कामांचे वाटप केले गेले आहे. त्यानुसार रामजन्मभूमी मंदिर न्यास व विश्व हिंदू परिषदेच्याकडे देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे, शरद पवार याशिवाय समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी आम्ही सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित दिले आहे. कोणालाही टाळलेले नाही. सर्वांनी सोहळ्याला यावे. यात राजकारण करू नये, असे अलोक कुमार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपली

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले नसल्यामुळे भाजपवर जोरदार टीका केली होती. आम्ही राम मंदिरासाठी एक कोटी रुपये दिले असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपचा हा पॉलिटीकल इव्हेंट संपल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊ, असे त्यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या टीकेवर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले होते. राज ठाकरे यांना निमंत्रण दिले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. यावर गिरीश महाजन म्हणाले होती की, अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. उद्धव ठाकरे साधे आमदार आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते. परंतु आता विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणावर पडदा पडणार आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.