Court : नीट परिक्षार्थींच्या करिअरशी खेळतंय कोण? यामागे रॅकेट तर नाही ना.. हायकोर्टाने विचारला जाब

Court : नीट परीक्षेच्या ढिसाळ व्यवस्थापनाविरोधात ओरड होत असताना आता हायकोर्टानेही त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे..

Court : नीट परिक्षार्थींच्या करिअरशी खेळतंय कोण? यामागे रॅकेट तर नाही ना.. हायकोर्टाने विचारला जाब
NEET चा गोंधळ थांबवाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 9:13 PM

औरंगाबाद : नीट (NEET Exam) परिक्षार्थींच्या करिअरशी (Career) कोण खेळतंय असा सवाल दस्तुरखूद्द हायकोर्टानेच विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेच्या ढिसाळ व्यवस्थापनाविरोधात ओरड होत असताना आता हायकोर्टानेही त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Bombay High Court, Aurangabad Bench) प्रश्नांची सरबत्तीच केली.

देशभरातील निष्पाप विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीशी खेळणारे नेमके कुठले रॅकेट सक्रीय आहे की काय? एजंसीच्या संकेतस्थळाशी कुणी सायबर गुन्हेगार छेडछाड करतोय का? याबाबत संशयास जागा असल्याचे मत औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले.

या प्रकरणाचा नीट परिक्षा घेणार्‍या परीक्षा एजंसीने अभ्यासपूर्वक आढावा घ्यावा आणि प्रकरणाच्या मूळाशी जाऊन गांभीर्याने कार्यवाही करावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

वैद्यकीय प्रवेशासाठी भूमिजा नेमिचंद राठोड या विद्यार्थीनीने नीट परीक्षा दिली. तिने पहिल्यांदा निकालपत्र डाऊनलोड केले असता तिला 720 गुणांपैकी 661 गुण मिळल्याचे स्पष्ट झाले.

पण या विद्यार्थिनीने दुसऱ्यांदा गुणपत्रिका डाऊनलोड केली असता तिला केवळ 218 गुण प्राप्त झाल्याचे दिसून आले. याप्रकाराविरोधात तिने अॅड. चैतन्य धारुरकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती.

न्या. रविंद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने सदर याचिका फेटाळून लावली. पण यादरम्यान ‘नीट’ संदर्भातील गोंधळावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढले.

संकेतस्थळावर उपलब्ध होणार्‍या भिन्न गुणतालिका आणि त्यामुळे ‘नीट’च्या परिक्षार्थींना मनस्ताप होतो. हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजंसीने याविषयीची जनजागृती करावी असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सुनावणी दरम्यान खंडपीठाने परीक्षा एजंसीस नोटीस बजावली होती. याचिकाकर्तीच्या मूळ ओएमआर उत्तरपत्रिका सादर करण्यास एजंसीच्या वकिलांना सूचित केले होते.

मात्र ओएमआर उत्तरपत्रिकांमधील उत्तरे ही अल्प गुण असलेल्या निकालपत्राशी मेळ खात असल्याने न्यायालयाने याचिका नामंजूर केली. पण न्यायालयाने गोंधळावर मत मांडले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.