ISRO Aditya-L1 | चांद्रयान 3 नंतर भारताचा यशस्वी सूर्य नमस्कार, आदित्य यान सूर्याच्या L1 कक्षेत स्थापित

ISRO Aditya-L1 | चांद्रयान 3 मिशननंतर भारताने सूर्याजवळ यशस्वी झेप घेतली आहे. सगळ्या देशवासियांच लक्ष या मिशनकडे लागल होतं. कारण भारताची ही पहिली सूर्यमोहिम आहे. पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किमी पर्यंतचा प्रवास भारताच्या आदित्य एल 1 ने यशस्वीरित्या पूर्ण केला. इस्रोने आणखी एका जबरदस्त कामगिरीने जगाला थक्क केलय.

ISRO Aditya-L1 | चांद्रयान 3 नंतर भारताचा यशस्वी सूर्य नमस्कार, आदित्य यान सूर्याच्या L1 कक्षेत स्थापित
Aditya L1 Mission
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 4:21 PM

Aditya-L1 Mission | भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO ने इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधनकांनी आणखी एक मोठ यश मिळवलं आहे. इस्रोने आदित्य यानाला यशस्वीरित्या सूर्याजवळच्या लॅग्रेज पॉइंट म्हणजे L1 च्या जवळपास हॅलो ऑर्बिटमध्ये स्थापित केलं आहे. सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 मिशनची आखणी केली आहे. L1 पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर एक टक्क्यावर येतं. इस्रोने मागच्यावर्षी 2 सप्टेंबरला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य सोलर ऑब्जर्वेटरीला सूर्याच्या दिशेने पाठवलेलं. भारताची सूर्याजवळची ही एक वेधशाळाच आहे.

आदित्य एल-1ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये जो लॅग्रेज (L1) पॉइंट आहे, त्या हॅलो कक्षेत स्थापन करण्यात आलं. लॅग्रेज (L1) पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण निष्क्रिय होतं. L1 पॉइंटवरुन सूर्यावर सतत नजर ठेवली जाईल. या यानामुळे सूर्याजवळ घडणाऱ्या घडामोडी आणि अवकाश हवामानावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करता येईल.

मिशनच टार्गेट काय?

इस्रोच्या पीएसएलवी-सी57 रॉकेटने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य-एल1 च यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. आदित्य एल 1 वेगवेगळ्या टप्प्यांमधून पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर गेलं. फक्त सूर्याचा अभ्यास आणि प्रत्येक छोट्यात छोट्या घडामोडीची माहिती देणं हाच ‘आदित्य एल1’ मिशनचा उद्देश आहे. सौर वातावरण, सूर्याची ऊर्जा, सूर्याचा पृष्ठभाग, सूर्यावर येणारे भूकंप हे उद्देश या मिशनमधून साध्य करण्यात येतील.

आदित्य एल1 मध्ये किती उपकरण?

आदित्य एल1 मध्ये सात साइंटिफिक पेलोड आहेत. हे सर्व पेलोड इस्रो आणि राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळेने विकसित केले आहेत. या पेलोडसना विद्युत चुंबकीय कण आणि चुंबकीय क्षेत्र डिटेक्टर्सचा उपयोग करुन प्रकाश मंडल, क्रोमोस्फीयर आणि सूर्याचा बाहेरील भाग कोरोनाचा निरीक्षण करण्यासाठी बनवण्यात आलं आहे.

50 हजार कोटी कसे वाचणार?

आदित्य-एल1 मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “या मिशनद्वारे फक्त सूर्याचाच अभ्यास करता येणार नाही, तर 400 कोटीच्या या प्रोजेक्टमधून सूर्यावर येणाऱ्या वादळांची माहिती मिळेल. त्यामुळे भारताचे 50 हजार कोटींचे अनेक उपग्रह सुरक्षित ठेवता येतील. एकप्रकारे ही देशाची मदतच आहे. हा प्रोजेक्ट देशासाठी खूप महत्त्वाचा आहे”

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.