केंद्र सरकारच्या डॉक्टरांना इशारा, जेनरीक औषधी लिहून न दिल्यास परिणाम भोगा
डॉ. अतुल गोयल यांनी डॉक्टरांना इशारा दिला की, कोणत्याही परिस्थितीत चिठ्ठीवर फक्त जेनरीक औषधी लिहिली गेली पाहिजे. केंद्र सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) डॉक्टरांना (Doctors) निर्देश दिले की, फक्त जेनरीक औषधी लिहून द्या. सोमवारी एक आदेशही जारी केला. जेनरीक औषधी (Generic Medicines) न लिहून देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. देशात जेनरीक औषधीबद्दल केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. आरोग्य सेवेचे संचालकांनी आदेश दिले की, जे डॉक्टर जेनरीक औषधी आपल्या चिठ्ठीत लिहणार नाही, त्यांच्याविरोधात मोठी कारवाई केली जाईल. काही डॉक्टरांकडून ब्राण्डेड औषधी लिहिली जाते. ही गोष्ट योग्य नाही.
डॉक्टरांना दिला हा इशारा
अतिरिक्त मेडिकल रिप्रेझेंटेट्विव्ह यांना डॉक्टरांना भेटण्यासाठी नवीन दिशानिर्देश जारी केलेत. डॉ. अतुल गोयल यांनी डॉक्टरांना इशारा दिला की, कोणत्याही परिस्थितीत चिठ्ठीवर फक्त जेनरीक औषधी लिहिली गेली पाहिजे. केंद्र सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला.
जेनरीक औषधी लिहिलीच पाहिजे
काही डॉक्टर जेनरीक औषधी आपल्या चिठ्ठीत लिहत नाही. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरने जेनरीक औषधीच चिठ्ठीत लिहीलं पाहिजे. यापूर्वी असे आदेश जारी करण्यात आले. परंतु, काही डॉक्टर ब्राँडेड कंपन्यांची औषध लिहून देतात.
किमतीत खूप फरक
ब्राँडेड औषधी लिहून देण्यामागे जेनरीकची उपलब्धता नाही, असे कारण दिले जाते. काही सरकारी रुग्णालयात जेनरीक औषधी उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. जेनरीक औषधी ब्राँडेड औषधींच्या तुलनेत स्वस्त असते. यामुळे रुग्णांवर आर्थिक भार पडत नाही. ब्राँडेड आणि जेनरीक औषधांच्या किमतीत खूप फरक पडतो.