Jammu and kashmir: श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर अतिरेक्यांचा अंदाधुंद गोळीबार; 2 पोलीस शहीद, 12 जखमी
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या 9व्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात 2 पोलीस शहीद झाले असून 12 पोलीस जखमी झाले आहेत.
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या 9व्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात 2 पोलीस शहीद झाले असून 12 पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.
श्रीनगरच्या पंथचौक परिसरात पोलिसांच्या बसवर अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, पोलिसांचं उलट प्रत्युत्तर सुरू होताच अतिरेक्यांनी या परिसरातून पलायन केलं. या हल्ल्यात 2 पोलीस शहीद झाले असून 12 पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.
सर्च ऑपरेशन सुरू
या हल्ल्यानंतर पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने अतिरेक्यांनी पलायन केलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. अतिरेकी पंथचौक परिसरातच लपून बसलेले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
काश्मीर टायगरचा हल्ला
या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, श्रीनगरच्या रंगरेथ परिसरात आज सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं. रंगरेथमध्ये अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्याची टीप सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने या परिसरात जोरदार सर्च ऑपरेशन केलं. त्यामुळे चोहोबाजूने घेरले जात असल्याचं लक्षात आल्यानंतर अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार झाले.
कालही एक ठार
गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. रविवारी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात एक अतिरेकी ठार झाला होता. समीर अहमद असं या अतिरेक्याचं नाव असून तो जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 13 December 2021- tv9 pic.twitter.com/6Y7unSL8Uy
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2021
संबंधित बातम्या:
भारताची सागरीशक्ती आणखी मजबूत, सुपरसोनिक मिसाईल टॉरपीडोमुळे भारताच्या दुष्मनांना धडकी
खबरदार! बायकोच्या परवानगीशिवाय फोन रेकॉर्ड कराल तर; आधी कोर्ट काय म्हणाले ते तर वाचा!