झूमच्या बहाद्दूरगिरीला भारतीय लष्कराची अखेरची सलामी…

झूम म्हणजे लष्करी श्वान, ज्यानं भारतीय लष्कराबरोब अनेक दहशतवादी कारवाईत भाग घेतला होता, आणि दहशतवाद्यांना गुडघे टेकायला लावले होते.

झूमच्या बहाद्दूरगिरीला भारतीय लष्कराची अखेरची सलामी...
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 4:22 PM

जम्मू-काश्मीरः जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी (terrorists)  मुकाबला करणाऱ्या भारतीय लष्कराचा (Indian Army) झूम या श्वानाला भारतीय लष्कराकडून आज अखेरची सलामी देण्यात आली. झूम (Zoom Dog) या श्वानाने दहशतवाद्यांबरोबर जोरदार लढत देऊन जखमी झाले होते. त्यानंतर झूमला चार दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पायाला आणि शरीराला गोळ्या लागल्याने चार दिवसाच्या अथक प्रयत्न करुनही झूम श्वानाचा आज मृ्त्यू झाला. झूमने 10 ऑक्टोबर रोजी अनंतनागमधील दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अनंतनगरमध्ये दहशतवाद्यांबरोबर लढताना झूमवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता.

त्यानंतर श्रीनगरमधील रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री 11.45 वाजेपर्यंत झूम श्वान उपचाराला चांगला प्रतिसाद देत होते.

त्याच्यावर उपचर करणाऱ्या डॉक्टरांनीही प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते.

पण अचानक झूमची तब्येत बिघडू लागल्यानंतर त्याला श्वास घेतानाही त्रास होऊ लागला होता. त्यातच उपचार सुरु असतानाच तो जमिनीवरही पडला होता.

त्यानंतर आज दुपारी झूमने अखेरचा श्वास घेतला. दहशतवाद्यांच्यावर कारवाई करताना त्याला दोन गोळ्या लागल्या होत्या. त्याचा पायही मोडला.

लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवानही जखमी झाले आहेत. या कारवाईत झूम श्वानानेही खूप मोठी कामगिरी केली होती.

त्याच्या समोर दहशतवाद्यांना अक्षरशः गुडघे टेकावे लागले होते. त्यानंतर या भागात कारवाई कडक करुन दोन दहशतवाद्यांचा खात्च करण्यात आला.

दहशतवाद्यावर कारवाई करताना ज्या घरात दहशतवादी लपले होते, त्या घरातून त्यांना काढण्याचे काम झूमकडे सोपवण्यात आले होते.

झूम श्वानाला कारवाईसाठी पाठवण्यात आले तेव्हा दहशतवादी लपलेल्या घरातच थेट घुसला होता, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या चालवल्या. त्यामध्ये झूमला दोन गोळ्या लागल्या होत्या.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.