दहशतवाद्यांनी घरात घुसून केली टीव्ही कलाकार अमरीन भट्टची हत्या; जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या
दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात अमरीन यांचा दहा वर्षाचा पुतण्याही गोळी लागून जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यालाही रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा गोळीबार (Terrorists fire again) सुरु केल्याची घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांनी आज सकाळी जम्मू काश्मीरमधील टीव्ही कलाकार अमरीन भट (TV actor Amareen Bhatt) यांची गोळ्या घालून हत्या केली. अमरीनची हत्या (Amareen Murder) झाल्यानंतर पोलीस चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे, दहशतवाद्यांनी हल्ला केला असून त्यांच्यासोबत लष्करातील तीन जवानही दहशतवाद्यांसोबत सामील असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.
Jammu & Kashmir TV artist Amreen Bhat lost her life today. Terrorists fired upon one Amreen Bhat at her residence in Chadoora, Budgam today: J&K Police
(Pic Source: Amreen Bhat’s Instagram account) pic.twitter.com/d218Cs8UMW
— ANI (@ANI) May 25, 2022
जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील जिल्ह्यातील चदूरा भागात दहशतवाद्यांनी टीव्ही कलाकार अमरीन भट यांची गोळ्या झाडून हत्या केली असून त्यांच्या सोबत त्यांचा भाचाही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Shocked & deeply saddened by the murderous militant attack on Ambreen Bhat. Sadly Ambreen lost her life in the attack & her nephew was injured. There can be no justification for attacking innocent women & children like this. May Allah grant her place in Jannat. pic.twitter.com/5I9SsymbD0
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 25, 2022
दहशतवाद्यांचा घरावर गोळीबार
दहशतवाद्यांकडून गोळीबा केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांना समजले की, सकाळी पावण आठच्या सुमारास चदूरा भागात अमरीन भट यांच्या घरावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अमरीन ठार; भाचा जखमी
दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात अमरीन यांचा दहा वर्षाचा पुतण्याही गोळी लागून जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यालाही रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
लष्कराचे तीन दहशतवादी सामील
या गुन्ह्यात प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कराचे तीन दहशतवादी सामील आहेत. या घटनेमुळे परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अमरीन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
बाहेर जात असताना हल्ला
याआधी मंगळवारी श्रीनगरमधील सौरा भागात दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलचीही त्याच्या घराबाहेरच गोळ्या झाडून हत्या केली होती. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात पोलीस ठार झाला तर त्यांची सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. कॉन्स्टेबल सैफुल्लाह कादरी आपल्या मुलीला शिकवणीला सोडण्यासाठी जात असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.
दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या
दहशतवाद्यांनी यापूर्वी 13 मे रोजी पुलवामा येथील पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याचवेळी, याच्या एक दिवस आधी 12 मे रोजी दहशतवाद्यांनी बडगाममध्ये सरकारी कर्मचारी राहुल भट यांच्या कार्यालयात घुसून त्यांची हत्या केली होती. दहशतवाद्यांच्या या कारवायांमुळे येथील सामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले असून दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत येथील सामान्य नागरिक नागरिक करीत आहेत.